अज्ञात वाहनाच्या धडकेने  अशोक  कुमटकर यांचा जागीच मृत्यू, वाहनधारक वाहनासह फरार

0

जामखेड तालुका प्रतिनिधी 

     जामखेड तालुक्यातील राजेवाडी येथील अशोक मारुती कुमटकर (वय ३९ वर्षे) यांना अज्ञात  वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. यातील मयत  हे त्यांची मोटरसायकल क्र. एम. एच. १६ बिडी २३४७ हिचे वरून राजेवाडी ते नान्नज जात असताना अज्ञात वाहनावरील चालकाने त्याचे ताब्यातील वाहन जोरात,अविचाराने ,रोडचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालून यातील मयत यांचे गाडीस धडक देऊन त्यांचे मृत्यूस कारणीभूत होऊन मयताचे गाडीचे नुकसान करून अपघाताची खबर न देता निघून गेला. यावरून फिर्यादी सुरज अशोक कुमटकर (वय १९ वर्षे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज्ञात वाहनावरील चालक (नाव पत्ता माहित नाही) याचे विरूद्ध गु.र.नं. व कलम : ४५६/२०२२ भादवि कलम ३०४(अ), २७९, ४२७,३३७ ,३३८.मोटर वाहन कायदा कलम १८४,१३४ (अ)(ब), १७७ प्रमाणे गुन्हा जामखेड पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेला आहे.

हा अपघात दि. १ आॅक्टोबर २०२२ रोजी रात्री ८ : ०० वाजेच्या सुमारास जामखेड करमाळा रोडवर नान्नज पोलीस दूरक्षेत्र समोर झाला आहे. या घटनेचा पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार शिवाजी भोस हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here