पैठण : येथील सामाजिक कार्यकर्ते विनोदकुमार मुंदडा यांनी आपल्या नातवाच्या वाढदिवसानिमित्त प्रवाह परिवारातील अनाथ मुलांना ड्रेस फराळ,फटाके देऊन दीपावली धुमधडाक्यात साजरी केल्याने परीसरात त्यांचे कौतुक होत आहे.
विनोदकुमार मुंदडा पैठण यांचे नातू चिरंजीव विराज सागर मुंदडा याच्या प्रथम वाढदिवसाच्या निमित्ताने प्रवाह परिवार अनाथ अश्रम येथील विद्यार्थ्यांना अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे ड्रेस देऊन त्यांची दीपावली धुमधडाक्यात साजरी करण्यात आली. मागील सातत्याने तीन वर्षापासून प्रयास शहरी व ग्रामीण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित प्रवाह परिवार उपक्रम (अनाथश्रम) हे टाकळी अंबड तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद येथे कार्यरत आहे. या आश्रमच्या माध्यमातून अनेक निराधार, अनाथ, आदिवासी व परिस्थिती अभावी शिक्षणापासून वंचित असलेल्या मुला/मुलींनी मोफत शिक्षण व त्यांचे मोफत पालन पोषण केले जात आहे. औरंगाबाद, जालना, बीड, सोलापूर, अहमदनगर व पुणे इत्यादी सहा जिल्ह्यातील 13 मुली व 16 मुले असे एकूण 29 मुला मुलींचा संभाल हा प्रवाह परिवार अनाथश्रमाच्या माध्यमातून केला जात आहे. ही सर्व मुले अगदी दोन वर्षापासून ते पंधरा वर्षापर्यंतची आहेत. प्राध्यापक रामेश्वर गोर्डे व त्यांच्या पत्नी सौ हेमा गोर्डे यांच्या माध्यमातून या मुलांचा सांभाळ केला जात आहे. आणि या सर्व विद्यार्थ्यांची दीपावली सुद्धा आनंदाने उत्साहाने साजरी व्हावी यासाठी मुंदडा परिवाराने एकसारखे नेहरू ड्रेस व मिठाईचे वाटप केले त्यावेळी निरागस विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मन खरोखर प्रसन्न झाले.
याप्रसंगी विनोद कुमार मुंदडा, सागर मुंदडा, सुरज मुंदडा व प्रवाह परिवार अनाथ आश्रम चे संस्थापक रामेश्वर गोर्डे सह आदी उपस्थित होते.
——–
फोटो : टाकळी अंबड येथील प्रवाह अनाथाश्रम मधील विद्यार्थ्यांना दिपावली निमित्ताने ड्रेस मिठाई देऊन विनोदकुमार मुंदडा यांनी दिपावली साजरी केली.(छायाचित्र : विनायक मोकासे, पैठण)