अभिनेत्री निशिगंधा वाड यांनी घेतले गुरु शुक्राचार्याचे दर्शन !

0

कोपरगाव : हिंदी व मराठी सिरियल तसेच प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री निशिगंधा वाड यांनी आज गुरु शुक्राचार्याचे दर्शन घेतले . निशिगंधा वाड यांचा आज वाढदिवस होता .त्यानिमित्ताने आपल्या वाढदिवस साजरा करण्यासाठी व यादिवशी कलेचे गुरू असलेले गुरू शुक्राचार्य यांचे खास दर्शन घेण्यासाठी त्या गुरू शुक्राचार्य मंदिरात आल्या होत्या , मंदिरात त्यांनी मनोभावे पूजा केली , यावेळी त्या म्हणाल्या की मंदिरातील प्रसन्न वातावरण पाहून त्यांनी मला मंगेशाची ( मंगेश मंदिर गोवा ) आठवण झाली . कलेचे आणि दैत्य गुरु असलेले शुक्रयाचार्य यांचे हे जगातील एकमेव मंदिर आहे, आणि आपल्या वाढदिवसाच्या दिवशी मला येथे दर्शनाचा योग आला . हे माझे भाग्य आहे. आतापर्यंत गुरु शुक्राचार्य , त्यांची संजीवनी विद्या , कच- देवयानी- ययाती ,आणि देव दानवांचा संघर्षाची केवळ कथा पुराणातूनच वाचल्या .आज मात्र प्रत्यक्ष यभूमीस मला भेट देता आली . यावेळी वाड यांनी . कोणताही स्टार डम न दाखविता अगदी मोकळे पणाने मंदिरात पूजा अर्चा केली .
या प्रसंगी देवस्थान ट्रस्ट तर्फे त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला . या प्रसंगी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड , मंदिर प्रमुख सचिन परदेशी , उप मंदिर प्रमुख प्रसाद पऱ्हे , शिंगणापूरचे सरपंच भीमा शेठ संवत्सरकर , विकास शर्मा , मंदिर व्यवस्थापक राजाराम पावरा , गुरू नरेंद्र जोशी, जालिंदर आढाव इत्यादी मान्यवर उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here