आमच्या अस्तित्वाला धक्का लागला तर ते बोट छाटल्याशिवाय रहाणार नाही : बच्चू कडू

0

नागपूर : “माझा आमच्या नेत्यांना प्रश्न आहे. राणा हे बोलण्याचं धाडस का करतात? राणाची अशी आरोप करण्याची कुवत नाही. ते कोणाच्या इशाऱ्यावर बोलत आहेत हे तपासावे लागेल. मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना नोटीस देणार आहे की तुम्ही पैसे दिले की नाही हे स्षष्ट करा.”
आमच्या अस्तित्वाला धक्का लागला तर बच्चू कडू ते बोट छाटल्याशिवाय रहाणार नाही, अशा शब्दात आ. बच्चू कडू यांनी आ. रवी राणा यांना इशारा दिला आहे.

दरम्यान, बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद विकोपाला गेला असताना त्याबाबत दीपक केसरकर त्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, बच्चू कडू हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या पक्षामध्ये दोन आमदार आहेत. त्यामुळे इतर आमदारांच्यावतीने ते बोलत असतील तर त्यामधील वस्तुस्थिती मला माहिती नाही.
“बच्चू कडू हे लवकरच मंत्रिपदी दिसतील, अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. मात्र जी व्यक्ती मंत्री बनणार आहे, तिने थोडा संयमही बाळगला पाहिजे, असं मला वाटतं.” कडू आपल्या पत्रकार परिषदेत म्हणाले की या पत्रकार परिषदेत बोलताना बच्चू कडू म्हणाले, “लोकांमध्ये असं पसरवलं जातंय की आम्ही ५० कोटी घेतले. आम्हाला कोणी ५ हजार पण दिले नाही. पण आमच्यावर असलेला डाग कायमचा मिटला पाहिजे.”

“विरोधक आरोप लावतात ते ठीक, पण आपलाच घरचा माणूस चुकीचे आरोप लावतोय. यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील बदनाम होत आहेत,” असंही ते पुढे म्हणाले.

“मी राणा यांना नोटीस पाठवणार आहे. त्यांनी माझ्याविरोधात 1 तारखेपर्यंत पुरावे द्यावे. हा आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. मी याबबात मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं. पण त्यानंतर पुन्हा राणांनी वक्तव्य केलं. आता कार्यकर्त्यांशी बोलून पुढे काय करायचं ते ठरवू. पक्षातला माणूस असा बोलतो तेव्हा हा आपला गेम तर होऊन राहिला नाही ना? असं प्रश्नचिन्ह निर्माण होतं,” ते म्हणाले.

राणा दांपत्यांच्या हनुमान चालिसा प्रकरणावर बोलताना बच्चू कडू म्हणाले की, “उद्धव साहेबांच्या घराबाहेर जाऊन हनुमान चालीसा म्हणणं चुकीचं होतं.”
राणा स्वतः हे बोलणार नाहीत, त्यांना बोलविता धनी वेगळाच आहे असाही संशय कडू यांनी व्यक्त केला.
“माझा आमच्या नेत्यांना प्रश्न आहे. राणा हे बोलण्याचं धाडस का करतात? राणाची अशी आरोप करण्याची कुवत नाही. ते कोणाच्या इशाऱ्यावर बोलत आहेत हे तपासावे लागेल. मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना नोटीस देणार आहे की तुम्ही पैसे दिले की नाही हे स्षष्ट करा.” यापूढे आ. रवी राणा यांनी बच्चू कडू वर आरोप करताना म्हटले होते की ‘मला असं वाटतं की, बच्चू कडू सोंगाड्या आहे. त्याला कुठल्याही प्रकारची मानमर्यादा नाही. मी गुवाहाटीला जाणारा आमदार नाही. बच्चू कडू जे आंदोलन करतो, ते फक्त तोडीसाठीच करतो. तोडीबाज म्हणून त्याची ओळख आहे,’ अशी पोस्ट आमदार रवी राणा यांनी सोशल मीडियावर केली.

त्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे सत्रच सुरू झाले.
आधी मानहानीकारक पोस्ट केली म्हणून आमदार बच्चू कडू यांनी रवी राणा यांच्याविरोधात अमरावती पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवून घेतला.
‘बच्चू कडू यांना काही सिद्धांत नाही, विचार नाही. ते दुसऱ्यांना दम देतात, गलिच्छ बोलतात. ते ज्या स्तरावर जातील त्या स्तरावर मलाही जाता येते’ अशी प्रतिक्रिया राणा यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर दिली.