माजी आमदार मनोहरशेठ भोईर व विधानसभा संपर्कप्रमुख महादेव घरत यांचा बी पी सी एल कंपनी प्रशासनाला इशारा.
उरण दि 28(विठ्ठल ममताबादे )रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील भेंडखळ येथील बी पी सी एल कंपनीसाठी जमीन संपादित करून सुध्दा नोकरी न देणाऱ्या बी पी सी एल कंपनीच्या अन्यायाविरोधात आमरण उपोषण करणाऱ्या भेंडखळ गावचे स्थानिक रहिवाशी तथा प्रकल्पग्रस्त अविनाश रमण ठाकूर यांच्यासह इतर शिल्लक राहिलेले दाखला धारक प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीबाबत निर्णय न घेतल्यास 9 नोव्हेंबर 2022 तारखेला गेट बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर व उरण विधानसभा संपर्कप्रमुख महादेव घरत यांनी बी पी सी एल कंपनी प्रशासनाला गुरुवार दिनाकं 27 ऑक्टोबर 2022 रोजी झालेल्या बैठकीत दिला आहे.
या बैठकीस शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर व उरण विधानसभा संपर्कप्रमुख महादेव घरत यांच्यासह कामगार नेते भूषण पाटील, प्रा एल बी पाटील, उरण सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, महिला तालुका अध्यक्ष सिमा घरत, संध्या ठाकूर, डोंगरी शाखाप्रमुख सचिन पाटील, लक्ष्मण ठाकूर,सूनित घरत , कृष्णा ठाकूर,योगिता ठाकूर , चित्रा ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल पाटील , बी पी सी एल कंपनी प्रशासनातील अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.उपोषण कर्ते अविनाश ठाकूर यांची प्रकृती खालावल्याने दि 25 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून साखळी उपोषणाला सुरवात झाली आहे. आता बीपीसीएल कंपनी सोबत झालेल्या बैठकीत थेट गेट बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आल्याने बीपीसीएल प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते याकडे सर्व शेतकऱ्यांचे, प्रकल्पग्रस्तांचे लक्ष लागले आहे.