
पाटण : तनु कला निर्मित व संजय पाटील दिग्दर्शीत एक थरारक मराठी वेबसिरीजच्या कलाकार निवडीसाठी पाटण येथील सी.गोल्ड रेस्टो’मध्ये ऑडीशन घेण्यात आले तेव्हा उदंड असा प्रतिसाद मिळाला.
यावेळी मुलाखत घेणाऱ्यानी कलाकारांना पूर्ण ग्रामीण बोली भाषा याबाबत चाचपणी केली. स्वतः ची वेगळी संवादरुपी झलकही पाहण्यात आली. आवाहन केल्याप्रमाणे सातारा, कराड, उंब्रज व पाटण परिसरातील स्थानिक कलाकारांनी उदंड असा प्रतिसाद मिळाला.लवकरच निवडीची यादी जाहीर होणार आहे.ऑडीशन नि:शुल्क होते.यावेळी हॉटेल सी गोल्ड रेस्टो’चे सर्वेसर्वा तथा बंधुत्व पाटणभूषण नितीन पिसाळ, बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर व दिग्दर्शक संजय पाटील यांची टीम व कलाकार उपस्थित होते.
फोटो : ओडिशनप्रसंगी संजय पाटील व मान्यवरांसह कलाकार.