कास्ट्राईब रापचे कामगार नेते चालक हर्षदीप सोनपसारे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

0


बुलडाणा,(प्रतिनिधी)- कास्ट्राईब रापचे कामगार नेते चालक हर्षदीप सोनपसारे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या निवृत्तीनंतरच्या कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

बुलडाणा आगाराचे कर्तव्य दक्ष चालक कास्ट्राईब राप कर्मचारी संघटनेचे मा. डेपोध्यक्ष हर्षदीप सोनपसारे हे राप सेवेत १९८९ साली जळगाव खान्देश विभागात आमळनेर, भूसावळ, मुक्ताईनगर डेपोत सात वर्ष सेवा केली व नंतर बुलडाणा विभागात विनंती बदली वरून १९९६ साली बुलडाणा आगारात रूजू झाले त्यांनी रापची ३४ वर्ष अपघात विरहीत “ प्रवाशांच्या सेवेसाठी “ बहुजन हिताय बहुजन सुखाय हे रापचे ब्रिद वाक्य समोर ठेवून सेवा केली. सेवेत असतांना फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने राप महामंडळात असलेल्या कास्ट्राईब राप कर्मचारी संघटनेचे डेपो अध्यक्ष असतांना कामगारांना कोणत्याही जाती धर्माचा असो त्यांना राप प्रशासना कडून न्याय मिळवून दिला.
कास्ट्राईब राप कर्मचारी संघटनेचे एकनिष्ठ व प्रत्येकावर प्रेम करणारे मनमिळाऊ स्वभावाचे, अधिकारी कर्मचारी यांचेसी सुमधूर संबंध जोपासणारे, एसटीवर जीवापाड प्रेम करणारे, जन्म दाते पहीले आईवडील व दुसरी जन्मदाती एसटी व प्रवासी हे आपले दैवत अन्नदाते समजून वागणारे नावा प्रमाणे हसतमुख असणारे आदर्श चालक हर्षदिप सोनपसारे आपली रापची सेवा करीत आंबेडकरी चळवळीत सक्रीय असत.
एसटी महामंडळात चालकाची ३४ वर्ष सेवा करून ते सेवेतून निवृत झाले आहे पण ते समाज सेवेतून निवृत्त झाले नाही रापची सेवाकरीत असतांना जन्मतःच आंबेडकरी चळवळीची शिकवण आईवडीलांनपासून मिळाल्यामुळे ह्यांनी नोकरी सोबत एसटी महामंडळात आंबेडकर जयंती बुलडाणा शहरात आंबेडकरी चळवळीचे कार्यक्रम असतील त्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी अशा कर्तृत्ववान चालकाचा मानसन्मान सत्कार होणे गरजेचे आहे म्हणून एसटी कास्ट्राईब राप कर्मचारी संघटनेचे मा.राज्यउपाध्यक्ष तथा शासनमान्य पत्रकार संरक्षण समीतीचे जिल्हा कार्यध्यक्ष पत्रकार बाबासाहेब जाधव यांनी त्याचा छोटेखानी कार्यक्रम आयेजीत करून त्यांना पुष्प गुच्छ, शाल व पत्नीस साडी देवून त्यांचा अंतःकरणातून सत्कार केला व पूढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या या प्रसंगी बुलडाणा राप विभागाचे विभागीय वाहतूक अधिकारी (आपराध) दिपक साळवे, बुलडाणा आगाराचे वाहतूक निरिक्षक पद्दमाकर मगर, पत्रकार बोर्डे, कामगार सेनेचे गजानन माने,कामगार संघटनेचे राजू पवार कास्ट्राईबचे रवि आवसरमोल, जितेंद्र साळवे, भारत आराख, संजय चितळे, भाऊसाहेब देशमुख,प्रल्हाद कांबळे, पद्दमाकर डोंगरे, संजय उबरहंडे, माऊली हॅाटेलचे मालक दत्ता मामा, शुभम उबरहंडे, अनिल उबरहांडे, इत्यादी उपस्थीत होते. सर्वांनी त्यांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here