खा. डाँ सुजय विखेंचा डाँ.तनपुरे साखर कारखान्याला अखेर रामराम

0

प्राजक्त तनपुरे यांनी कारखाना चालवून आजोबांचा नावलौकीक वाढविण्याचा सल्ला देवळाली प्रवरा/ प्रतिनिधी राजेंद्र उंडे 

        डॉ.तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उच्च न्यायालयाचा अवमान करायचा नाही म्हणून खा.सुजय विखे यांनी बोलणे टाळले परंतु जाता जाता डॉ.तनपुरे कारखान्यास खा.सुजय विखे यांनी रामराम ठोकला आणि तुमच्या तालुक्याचे भाग्यविधाते यांच्या नातवाने अर्थात माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी कारखाना चालवण्यास घ्यावा असे आवाहन देऊन आजोबाचा नावलौकिक राज्यात करावा असे विखे यांनी तनपुरे यांना सूचित केले आहे.एकप्रकारे गेल्या सहा वर्षांनंतर तनपुरे कारखान्याच्या कार्यभरावर होणारे आरोप प्रत्यारोप यास कंटाळुन विखे यांनी डॉ.तनपुरे कारखान्यास रामराम ठोकला असल्याची चर्चा सुरु आहे.

             डॉ.तनपुरे कारखान्याची 67 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी कारखान्याच्या गोडाऊनमध्ये संपन्न झाले.सभेच्या अध्यक्षस्थानी विद्यमान चेअरमन नामदेव ढोकणे होते. यावेळी खा.सुजय विखे बोलत होते.

          पुढे बोलताना खा.विखे म्हणाले की, माझ्याकडे 5 वर्षांची जबाबदारी दिली होती ती 6 वर्ष पार पाडली आहे.कामगारांचा न्यायालयात निकाल लागला.जमीन विक्रीची प्रकिया न्यायालयाने ठरवून दिली. जिल्हा बँकेचे कर्ज असल्याने जमीन विक्रीची प्रकिया स्थगित झाली मात्र न्यायालयात येत्या १३ ऑक्टोबर रोजी मी माझी बाजू मांडणार आहे. आता  जर बोललो तर न्यायालयाचा अवमान होईल त्यामुळे भाष्यात मी पडणार नाही असे विखे यांनी सांगुन  जमीन विक्री प्रकियेबाबत माझा कोणताही संबध नाही.उलट राहुरी तालुक्याने बाहेरचे नेतृत्व स्वीकारल्याबद्दल मी तालुक्यातील सभासदांचे आभार मानतो असे विखे म्हणाले.

             गेल्या 11 वर्षात कारखाना चालला नही अशा पद्धतीने कारखाना चालवून उच्चाकी गाळप व नियमित पेमेंट करून सभासदांची अपेक्षा पूर्ण केल्याचे विखे म्हणाले. राहुरी तालुक्यास लोकप्रतिनिधी नव्हता का? आज जे आमदार व माजीमंत्री आहेत. त्यांच्याच आजोबाच्या नावावर कारखाना आहे.हा कारखाना चालविण्याची जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे. राहुरीचा सभासदांत सहनशीलता आहे ती इतर ठिकाणी कुठंही पाहायला मिळत नाही. कारखाना म्हंटल्यानंतर अर्थकारण आले ते मागे पुढे होत असते. ज्या सभासदांना आम्ही योग्य वाटत नाही त्यांनी संचालक व्हावे व कारखाना चालवायला घ्यावे असा टोला पत्रकार परिषद घेणारे सभासद तसेच धुमाळ व तनपुरे पिता  पुत्रांना लगावला.

अमृत धुमाळ व माजी खा.प्रसाद तनपुरे यांना तुम्ही कोणतेही आंदोलन करू नका , बचाव कृती समिती स्थापन करू नका मी स्वताहुन तुमच्या ताब्यात कारखाना देतो , तुमच्याच वडिलांनी उभा केलेला कारखाना तुम्ही चालवलाच पाहिजे.तुमच्या वडिलांचे- आजोबांचे वैभव तुम्हीच पुन्हा निर्माण केले पाहिजे.आम्ही आमच्या वडिलांचे- आजोबा-पंजोबांचे वैभव टिकून ठेवले असल्याचे विखे यांनी सांगितले.

                 डॉ.तनपुरे कारखान्याचे 6 वर्षात मी सोने केले आहे. तुम्ही तर तो भंगारात विकायला काढला होता.1800 टनावरून 4 हजार टनांपर्यंत करखाना नेऊन ठेवला. तुम्ही घेतलेले जिल्हा बँकेचे कर्ज आम्हांला फेडावे लागले.मी कर्जही घेतले नाही, वीजही वापरली नाही. तरी हि त्याची भरपाई मला करावी लागली असे विखे यांनी सांगितले.

               माझ्या काळातील  डॉ. तनपुरे कारखान्याकडे ज्या शेतकऱ्यांचे पैसे राहिले असतील त्या शेतकऱ्यांना मी माझे स्वतःचे घर विकून पैसे देण्यास बांधील आहे. 6 वर्षात कारखाना नवा करून दिला आहे.तालुक्याच्या नेत्यांनी कारखाना चालविण्याची जबाबदारी घेतली पाहिजे असे विखे यांनी सांगितले. 

            डॉ तनपुरे कारखान्याची निवडणूकीची घोषणा केव्हाही होऊ शकते.हे माझे शेवटचे वर्ष आहे.या पुढील काळात कारखान्याची जबाबदारी तुमच्या राहुरीच्या आमदारांना द्यावी. माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे डॉ.तनपुरे कारखाना चालू करण्यासाठी मोलाचे योगदान आहे त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मी करतो.तुमच्या तालुक्यात पहिल्यांदा आमदार झालेले मंत्री झाले.त्या लोकप्रतिनिधीवर तालुक्याच्या सभासदांनी जबाबदारी सोपवली पाहिजे.त्यांना काही सहकार्य लागत असेल तर मी सहकार्य करण्यास तयार आहे.माझ्या प्रपंचाची जबाबदारी माझ्यावर आहे.त्यामुळे माझा प्रपंच मला सांभाळू द्या, मला राजकारणाचा मोह नाही. परंतु शेतकऱ्यांबद्दल आत्मयिता असल्याने तुमचा कारखाना चालवून दाखविला.यापुढे तुम्ही सभासद ठरवा की कारखाना कोणाच्या ताब्यात द्यायचा.माझा माञ रामराम घ्यावा. तालुक्यातील लोकप्रतिनिधीनी कारखाना चालवुन दाखविण्याचे जाहीर आवाहन विखेंनी दिले.

         विषय पत्रिकेवरील विषयांवर नामदेव ढोकणे, भारत पेरणे, कारभारी कणसे, अनिल शिरसाठ, पंढरीनाथ पवार, चांगदेव तारडे, बळीराम खुळे, सुनील काळे आदींनी सहभाग घेऊन चर्चा केली.

           यावेळी व्यासपीठावर जेष्ठ नेते सुभाष पाटील,रावसाहेब तनपूरे, कारखान्याचे चेअरमन नामदेव ढोकणे, व्हा.चेअरमन दत्तात्रय ढुस, उदयसिंह पाटील, विजय डौले, शामराव निमसे, शिवाजी गाडे, सुरशिंग पवार, भारत तारडे,तान्हाजी धसाळ, उत्तम म्हसे, डाॅ.संभाजी पठारे, आर.आर.तनपुरे,साहेबराव म्हसे,विक्रम तांबे, सुरेश लांबे, राजेंद्र उंडे, शिवाजी डौले,पंढरीनाथ पवार, अर्जुन पानसंबळ, आप्पासाहेब ढुस, मच्छिंद्र तांबे,नंदकुमार डोळस, अनिल आढाव, सुनिल आडसुरे,दत्तात्रय खुळे, बाबा खुळे आदि होते. सभेस सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट

      चारभिंतीत पञकार परीषद घेणारे आलेच नाही...

              डाँ.तनपुरे सहकारी साखर कारखान्याबाबत स्वर्गीय रामदास पाटील धुमाळ युवा मंचाचे अध्यक्ष अमृत धुमाळ हे नेहमीच आरोप करत असतात. कारखान्याची जमीन विक्री, मशीन विक्री आदींबाबत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी वेळोवेळी केला आहे. यावेळी माजी खा.प्रसाद तनपुरे, सुरेश वाबळे,अरुण कडू यांना एकञित करुन पञकार परीषद घेतली माञ या सभेत  अमृत धुमाळ व माजी खा. प्रसाद तनपुरे त्यांचे सहकारी येऊन काहीतरी बोलतील असे अनेक सभासदांना वाटत होते. मात्र खा.विखेंपुढे बोलण्याचे धुमाळ यांचे धाडस नाही का.? त्यांच्या आरोपात तथ्य असतील तर ते सभेत उपस्थित का रहात नाही.? केवळ चार भिंतीच्या आत पत्रकार परिषद घेत पोपटपंची करण्यातच धुमाळ धन्यता मानतात का अशी चर्चा सभासदांत सभास्थळी होती.