…..त्या प्रकारणाबाबत पालकमंत्री यांना निवेदन सादर

0

सातारा/अनिल वीर : गमेवाडी ता. कराड येथील सरपंच सविता रामचंद्र ढवळे व सदस्य यांना जातीवादी मानसिकतेतुन जाणीवपूर्वक पद रद्द करण्याकरीता राजकीय षडयंत्र रचणाऱ्या ग्रामसेवक प्रशांत सदाशिव कारंडे, उपसरपंच वसंत पांडुरंग जाधव यांना निलंबित करुन कठोर कारवाई करावी.अशी मागणी पालकमंत्री ना.शंभुराजे देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

     मागासवर्गीय प्रवर्गातून सरपंच म्हणुन सविता ढवळे व त्यांची आई सौ. बाळकाबाई ढवळे या गावातील एकाच कुटुंबातील व्यक्ती निवडणुकीत बिनविरोध निवडुण आल्या होत्या.गावात इतर मागासवर्गीय प्रवर्गाचे एकच कुटुंब वास्तव्यास आहे. या गावातील आलेल्या इतर सदस्यांनी वय वर्षे ७५ असणाऱ्या सौ. बाळकाबाई ढवळे यांना सरपंच बनविण्याचा कुटील डाव आकला होता. परंतु त्यांचे वय पाहता त्यांची मुलगी सविता ढवळे यांना प्रशासनाने अनुमोदक आई तर सुचक स्वतः प्रशासन होऊन सरपंचपदी निवड करण्यात आली. याचाच मनात राग धरुन सर्व सदस्य उपसरपंच वसंत पांडुरंग जाधव व ग्रामसेवक प्रशांत कारंडे यांनी जाणीवपूर्वक जातीय द्वेषातुन ओ.बी.सी. महिला सरपंच असल्याने जाणीवपूर्वक राजकीय डावपेच टाकून त्रास देण्याचे काम चालु केले आहे. यामध्ये सदर कारभार मनमानी करुन न झालेल्या कामाचे चेक पुर्ण झाले असल्याचे दाखवत गैरव्यवहार करीत आहेत. मुंबई ग्रामपंचायत अधिनियमांचे उल्लंघन करुन सरपंच सविता ढवळे यांच्या परस्पर बेकायदेशीर व्यवहार व कारभार चालवत आहेत. तसेच त्या कुटुंबीयांना मंजुर झालेले घरकुल काम चालु असताना अडथळे अणुन ते बंद पाडण्यात आले आहे.त्यांचे वडिल ९२ वर्षाचे असल्याने रामचंद्र तुकाराम ढवळे यांना कारण नसताना खोटे नाट्य राजकीय हेतुने तक्रारी करुन कोर्टाच्या पायऱ्या झिजविण्यास भाग पाडले आहे. याचा जाब विचारता अपमानीत करुन जाती वाचक शिवीगाळ, दमदाटी, अंगावर येणे असे प्रकार सातत्याने ग्रामसेवक, उपसरपंच करत असुन हे मानवतेला काळिंबा फासणारे कृत्य चालु आहे. अश्या जातीवादी मानसिकतेत काम करणाऱ्या ग्रामसेवक व उपसरपंच यांना निलंबित करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. अन्यथा,ढवळे कुटुंबीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहे.प्रशासनाने लवकरात लवकर दखल घेऊन न्याय द्यावा.अशीही मागणी रिपब्लिकन सेनेच्यावतीने करण्यात आली आहे.

          सदरचे निवेदन पालकमंत्री यांच्यासह मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, खा. श्रीनिवास पाटील, उप मुख्यकार्यकारी अधिकारीधिरी (ग्रा.प.) आदींना प्रति देण्यात आलेल्या आहेत.

फोटो : पालकमंत्री ना.शंभूराजे देसाई यांना निवेदन सादर करताना ढवळे कुटुंबियांसह मान्यवर.(छाया-अनिल वीर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here