सातारा : वास्तव परिस्थितीचे भान ठेवुन शाहिर माधव भोसले दुरदृष्टीने जीवन जगले. खरोखरच, त्यांना जीवन समजले होते.त्यांनी स्वतःचा व्यवसाय, कुटुंबासह समाजप्रबोधन केले. असे विचार संबोधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनकर झिंब्रे यांनी व्यक्त केले.
येथील प्रमिला मंगल कार्यालयात कालकथीत शाहिर माधव अण्णा भोसले यांच्या पुण्यानुमोदन कार्यक्रमात आदारांजलीपर दिनकर झिंब्रे मार्गदर्शन करीत होते.ते पुढे म्हणाले,शाहिर भोसले यांनी केलेल्या कार्याची दखल घेतली पाहिजे.तेव्हा शाहिरांच्या स्मृती जागविण्यासाठी कलावंत व धम्मबांधवांनी एकत्रीत आले पाहिजे.
भारतीय बौद्ध महासभेचे प. जिल्हाध्यक्ष भागवत भोसले म्हणाले,”शाहिर भोसले यांनी पूर्ण हयातभर समाजासाठी प्रेरणा दिली.” तालुकाध्यक्ष आबासाहेब दणाने म्हणाले,”अधिकारी हे घर व नोकरीत रमतात.परंतु याउलट शाहिर भोसले यांनी शाहिरांच्या माध्यमातून माणसाची संपत्ती जमवलेली आहे.” रिपब्लिकन सेनेचे प.महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत म्हणाले, “फुले – शाहु – आंबेडकर यांचा शाहिरीतील आवाज हरपला आहे.शाहिर भोसले यांनी माझ्यासारखे कार्यकर्ते घडविले. फक्त ते गात नव्हते तर माता रमाईच्या जीवनावरील गीते भावुक होऊन गात होते.त्यांच्या शाहिराचा वारसा जोपासण्यासाठी एकत्रीत प्रयत्न केला पाहिजे.” विलासराव कांबळे म्हणाले, “कलेचा जलसा शाहिर भोसले यांच्यामुळे मोठ्या उंचीवर गेला होता.मात्र,त्यातील हार्मोनियम थांबला आहे.” पी.डी. साबळे म्हणाले,”शाहिरांनी केलेले कार्य अजरामर राहील.त्यांच्या पत्नी यांचेही निधन झाल्याने या वर्षात ते खचले होते.संसाराची दोन चाके म्हणून त्यांनी परिवारासाठीही भक्कम असे कार्य केलेले आहे.” रमेश इंजे म्हणाले,”पहिल्यांदा लोकनाट्य/तमाशा या माध्यमातून व तदनंतर शाहिर जलासाची निर्मितीतून प्रबोधन करण्यात आले.”
युवा शाहिर गायकवाड म्हणाले, “शाहिरामुळेच आम्ही गायन क्षेत्रात आलो आहोत.” प्रभाकर बनसोडे म्हणाले,” शाहिर भोसले यांना धम्माची आवड पहिल्यापासूनच होती.शाहिरी क्षेत्रातील तारा निखळला आहे.” धम्मचारी साळवे म्हणाले,”धम्मात सामर्थ्य आहे.त्यामुळे जे धम्मप्रवाहात येतात.त्यांनाच आपलेसे करावे.” शाहिर श्रीरंग रणदिवे म्हणाले,”पाईसा कलामंचच्या माध्यमातून आमचे आदरणीय शाहिर माधवदादा यांचे अखेरपर्यंत मार्गदर्शन लाभले.” किरण जगताप व अनिल जगताप म्हणाले, “पत्र्याच्या शेडमध्ये बाबासाहेब यांचे विचार शाहिरांनी जागवले होते.” दिलिप फणसे म्हणाले, “शाहिरांनी ३५ वर्षे झाली समाजप्रबोधनाचे कार्य केले होते.” अनिल वीर म्हणाले, “शाहिर भोसले दादा यांनी अखेरपर्यंत समाजप्रबोधन केले.स्पष्टपणे गाणारा व बोलणारा वक्ता अशी त्यांची ख्याती होती.शाहिरांच्या स्मृती जागविण्यासाठी सर्वानी एकत्रीत येऊन खारीचा वाटा उचलून शाहिर कलावंताचे संघटन केले पाहिजे.” याशिवाय जिल्ह्यातील एकमेव भन्ते दिंपकरजी, रिपब्लिकन सेनेचे गणेश कारंडे, अरुण जावळे आदींनीही आदरांजलीपर मनोगत व्यक्त केली.प्रारंभी, भोसले-घोडके परिवाराने महापुरुष व शाहिर दादा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. बौद्धाचार्य यशपाल बनसोडे यांनी संपूर्ण विधी पार पाडला.सदरच्या कार्यक्रमास भारतीय बोउद्ध महासभेचे संस्कार विभाग जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार काळे, प्रकाश तासगावकर,माजी केंद्रप्रमुख रामचंद्र गायकवाड,ऍड.विलास वहागावकर,बबन वन्ने,शामराव बनसोडे, प्राचार्य प्रकाश रणबागले, विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, उपासक – उपासिका,सर्व भोसले व घोडके कुटुंबीय मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
फोटो : शाहिर माधव भोसले व महामानव यांच्या प्रतिमेस अभिवादनप्रसंगी मान्यवर व कार्यकर्ते.