पनवेल तालुक्यातील एकमेव ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने खाते उघडले.

0

उरण दि 19(विठ्ठल ममताबादे )

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने तसेच मनसे नेते अमितसाहेब  ठाकरे यांच्या  मार्गदर्शनाखाली तसेच पनवेल तालुका अध्यक्ष  रामदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यामधील एकमेव खैरणे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे   कैलास हरी माळी यांचा भरघोस मतांनी विजय  झाल्याबद्दल पनवेल तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी पनवेल तालुका गड कार्यालयामध्ये एकच जल्लोष करून विजयोत्सव साजरा केला. यावेळी दीपक कांबळी रायगड उपजिल्हाध्यक्ष,   प्रवीण दळवी रायगड उपजिल्हाध्यक्ष, अविनाश पडवळ रायगड जिल्हा सचिव,वर्षा पाचभाई  उपजिल्हाध्यक्ष महिला सेना,  रोहिणी पाटील उप-तालुका अध्यक्ष महिला सेना, योगेश पाटील तळोजा विभाग अध्यक्ष,अरविंद पाटील वावजे विभाग अध्यक्ष, सुरज गायकर पनवेल उपशहर अध्यक्ष,

सुरज भोपी उप-विभाग अध्यक्ष,गजानन मढवी तळोजा विभाग अध्यक्ष, महाराष्ट्र सैनिक तुळशीराम पाटील. नितेश पाटील. सावन पाटील. सचिन पाटील. प्रवीण पाटील. सोमनाथ शिंगारे,मुकेश बोंबे, भरत पाटील आदी उपस्थित होते.सदर ग्रामपंचायत विजयासाठी सर्व सहकारी आणि खैरणे ग्रामस्थांचे तालुका अध्यक्ष रामदास पाटील यांनी आभार मानले. तसेच या पुढे देखील आपण सर्वांनी मेहनत करून  राजसाहेबांचे नवनिर्माणाचे स्वप्न साकार करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहूया असे उपस्थितांना मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here