*❂ दिनांक:~ 20 सप्टेंबर 2022 ❂*
* वार ~ मंगळवार *
* आजचे पंचाग *
━═•●◆❃★❂★❃◆●•═━
*भाद्रपद. 20 सप्टेंबर*
*तिथी : कृ. दशमी (मंगळ)*
*नक्षत्र : पुनर्वसु,*
*योग :- वरीयान*
*करण : वनिज*
*सूर्योदय : 06:18, सूर्यास्त : 06:42,*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
* सुविचार *
*स्वतः साठी मागितले की भीक, कुटुंबासाठी भिक्षा, समाजासाठी दान आणि जगासाठी पसायदान आहे*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*म्हणी व अर्थ *
*काम कवडीचं नाही अन् फुरसत घडीची नाही.*
*अर्थ:- काहीही काम न करणारा माणूस नुसत्या सबबी सांगतो.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*दिनविशेष *
*या वर्षातील 263 वा दिवस आहे.*
* महत्त्वाच्या घटना *
*१६३३: पृथ्वी सूर्याभोवती फिरत असल्याचे प्रतिपादन केल्याबद्दल गॅलिलिअो यांच्यावर खटला चालवण्यात आला.*
*१८५७: चा राष्ट्रीय उठाव – ब्रिटिश (ईस्ट इंडिया कंपनीच्या) सैन्याने दिल्ली परत ताब्यात घेतली.*
*१८७८: भारतातील सर्वाधिक प्रचलित इंग्रजी भाषिक वृत्तपत्र द हिंदू चे प्रकाशण साप्ताहिक वृत्तपत्राच्या रूपाने सुरु करण्यात आलं.*
*१९१३: वीर वामनराव जोशी यांच्या ’राक्षसी महत्त्वाकांक्षा’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईत झाला.*
*१९७३: बॅटल ऑफ सेक्सेस – ह्यूस्टन, टेक्सास येथे बिली जीन किंग या महिलेने बॉबी रिग्ज या पुरूषाचा लॉन टेनिस मधे पराभव केला.*
*१९७७: व्हिएतनामचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.*
*२००१: अमेरिकेने दहशतवादाविरुद्ध युद्ध पुकारले (War on Terror).*
*जन्मदिवस / जयंती*
*१८५६: साली भारतातील आध्यात्मिक नेते आणि समाजसुधारक नारायण गुरु यांचा जन्मदिन.*
*१८९७: नारायण भिकाजी तथा ‘नानासाहेब’ परुळेकर – ’सकाळ’ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष व भारतीय पत्रकारितेचे पितामह, (मृत्यू: ८ जानेवारी १९७३)*
*१९०९: गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर – गुजराती लेखक व समीक्षक, पद्मश्री (१९९१), गुजराती साहित्य परिषदेचे अध्यक्ष, गुजरातीतील मनोविश्लेषणात्मक कथेची सुरुवात करण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते. (मृत्यू: १० जून १९०६ – पुणे)*
*१९११: भारतीय तत्त्वज्ञानी आणि कार्यकर्ते श्रीराम शर्मा यांचा जन्म (मृत्यू: २ जून १९९०)*
*१९२२: द. न. गोखले – चरित्र वाङ्मयाचे गाढे संशोधक, मराठी शुद्धलेखनाचे अभ्यासक, पुणे विद्यापीठाने त्यांना डी. लिट पदवी देऊन गौरविले होते.*
*१९२३: भारतीय अभिनेते आणि निर्माते अक्किनेनी नागेश्वर राव यांचा जन्म (मृत्यू: २२ जानेवारी २०१४)*
*१९२५: आनंद महिडोल तथा राम (सातवा) – थायलँडचा राजा (मृत्यू: ९ जून १९४६)*
*१९३४: भारतीय व्यंगचित्रकार आणि पत्रकार राजिंदर पुरी यांचा जन्म. (मृत्यू: १६ फेब्रुवारी २०१५)*
*१९४६: भारतीय वकील आणि न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांचा जन्म.*
*१९४९: महेश भट्ट – चित्रपट दिग्दर्शक*
*मृत्यू / पुण्यतिथी*
*१३३८: दिल्ली येथील तुघलक वंशीय सत्तेचे सम्राट शासक फिरोज शाह तुगलक तृतीय यांचे निधन.*
*१८१०: मीर तकी मीर – ऊर्दू शायर (जन्म: ? ? १७२३)*
*१९१५: संत गुलाबराव महाराज (जन्म: ६ जुलै १८८१)*
*१९२७: पॅन-इस्लामिक चळवळीबद्दल सहानुभूती असलेले भारतीय क्रांतिकारक अब्दुल हाफिज मोहम्मद बराकतउल्ला यांचे निधन.*
*१९२८: केरळमधील समाजसुधारक नारायण गुरू यांचे निधन.*
*१९३३: अॅनी बेझंट – थिऑसॉफिस्ट, सामाजिक कार्यकर्त्या व भारतीय स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या, त्यांनी हिंदू धर्म व संस्कृतीचे सखोल अध्ययन केले होते. त्यांनी भगवद्गीतेचे इंग्रजीत भाषांतर केले होते. त्यांची ग्रंथसंख्या सुमारे ४५० इतकी आहे. १९१६ मध्ये त्यांनी ’होमरुल लीग’ची स्थापना केली. (जन्म: १ आक्टोबर १८४७)*
*१९४२: भारत छोडो आंदोलनाच्या वेळेला राष्ट्रध्वज घेऊन निघालेल्या मिरवणूकीचे नेतृत्व करीत असतांना केलेल्या गोळीबारात थोर भारतीय क्रांतिकारक महिला कनकलता बरुआ यांचे निधन झाले.*
*१९७९: चेकोस्लोव्हेकियाचे राष्ट्राध्यक्ष लुडविक स्वोबोदा यांचे निधन.*
*१९९६: कवी, कथाकार, सामिक्षक, विचारवंत दगडू मारुती पवार उर्फ दया यांचे निधन.*
*१९९७: कल्याण कुमार गांगुली तथा अनुप कुमार – चित्रपट अभिनेते (मृत्यू: ९ जानेवारी १९२६ – खांडवा, मध्य प्रदेश)*
*२०१२: प्रख्यात भारतीय नाट्य दिग्दर्शक, रंगमंच, दूरदर्शन आणि हिंदी चित्रपट अभिनेते दिनेश ठाकूर यांचे निधन.*
*२०१५: भारतीय उद्योजक जगमोहन दालमिया यांचे निधन. (जन्म: ३० मे १९४०)*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*सामान्य ज्ञान *
*ऐतिहासिक महाभारत हे कोणी लिहिले ?*
*व्यासमुनी*
*कोयना धरण कोणत्या जिल्हयात आहे ?*
*सातारा*
*केळीसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे ?*
*जळगाव
*पोलाद तयार करण्यासाठी कोणता धातू वापरला जातो ?
*लोह
*वि. वा. शिरवाडकर यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते ?*
*कुसुमाग्रज*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*बोधकथा*
*माणुसकीचा रामराम*
एका बर्फाच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीची ही गोष्ट आहे. कामाचा वेळ संपत आला होता सगळे घरी जाण्यासाठी तयार होते.तेवढ्यात कंपनीमध्ये थोडा तांत्रिक बिघाड झाला. म्हणून तो व्यक्ति तो बिघाड दुरुस्त करायला गेला. त्याला काम करण्यात खुप उशीर लागला. तोपर्यंत प्लांट बंद झाला. लाइट बंद करून दरवाजे सील करण्यात आले. अशा परस्थितित त्याचा बर्फ आणि थंडी ने जिव जाणे, निश्चित होते..!!त्या माणसाला काही सुचेनासं झालं,पण तासा भरात एक चमत्कार झाला. आणि कोणी तरी दरवाजा उघडला. तो समोर पाहतो तर सुरक्षा रक्षक हातात टॉर्च घेऊन उभा होता. त्याने त्याला बाहेर काढून त्याचा जिव वाचवला. प्लांट बाहेर आल्यावर त्याने सुरक्षा रक्षकाला विचारले, “तुम्हाला कसे कळले की मी आत अडकलोय.” सुरक्षा रक्षक म्हणाला, “या प्लांट मध्ये जेवढे लोक काम करतात त्यात तुम्ही एकटेच असे आहात की जे रोज मला येताना नमस्कार आणि जाताना “राम राम” बोलता… आणि आज सकाळी तुम्ही कामावर आलात पण संध्याकाळी गेला नाहीत. म्हणून माझ्या मनात शंका आली आणि मी पाहायला आलो.”
*त्या व्यक्तीला कधी वाटले देखील नव्हते की त्याचे एखाद्याला एवढा छोटा सन्मान देणे, एक दिवस त्याचा जिव वाचवेल.*
*म्हणून नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा कधीही कोणाला भेटाल तेव्हा त्याच्या सोबत हसून सन्मान पूर्वक बोलून मग पुढे जा.*
*तात्पर्य :*
*माणूसकीच तुम्हांला शेवट पर्यंत साथ देईल… म्हणून सर्वांबरोबर माणूसकीने वागा.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
* आजच्या बातम्या *
*राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर, राष्ट्रवादी आणि भाजपची सरशी, काँग्रेसची पिछेहाट*
*संजय राऊत यांचा जेलमधील मुक्काम वाढला, कोठडी 14 दिवसांनी वाढली, पत्राचाळ घोटाळ्यातील मास्टरमाईंड संजय राऊतच, आरोपपत्रात ईडीचा दावा.*
*सणासुदीच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांवर आर्थिक संक्रांत? शिंदे सरकारच्या निर्णयामुळे महामंडळ पेचात.*
*विदर्भातील जनतेला वेगळा विदर्भ हवा असेल तरच वेगळ्या विदर्भाचा निर्णय घ्यावा.. वेगळ्या विदर्भासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर राज ठाकरे यांचं उत्तर.*
*शिवसेना दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कची जागा नाकारली तर कोर्टात जाण्याची तयारी, महापालिकेने प्रलंबित अर्जावर उत्तर देण्यास आणखी उशीर केला तर मैदानात उतरुन प्रत्युत्तर देण्याचा इशारा.* ‘
*महाराणी एलिझाबेथ यांच्यावर अंत्यसंस्कार, भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह अनेक देशांच्या प्रमुखांची अंत्यसंस्कारासाठी उपस्थिती*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
सौ. सविता एस देशमुख*
*उपशिक्षिका पाताळेश्वर माध्य. विद्यालय पाडळी, ता -सिन्नर जिल्हा- नाशिक.*
*7972808064*
*श्री. देशमुख. एस. बी*
*सचिव*
*नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ*
*कार्यवाह – नाशिक जिल्हा T.D.F.*