परीपाठ/पंचाग/दिनविशेष

0

दिनांक:~  21 सप्टेंबर 2022* 

        *वार ~ बुधवार* 

           *आजचे पंचाग

*भाद्रपद. 21 सप्टेंबर*

     *तिथी : कृ. एकादशी (बुध)*   

        *नक्षत्र : पुष्य,*

          *योग :- परीघ*

     *करण : बव*

*सूर्योदय : 06:19, सूर्यास्त : 06:41,*

          *सुविचार

*पैसे कमवत कमवत जगू नका,  जगता जगता पैसे कमवा शेवटी खूप पैसे कमवाल पण जगणंच विसरून जाल ….*

          *म्हणी व अर्थ

*जशी नियत तशी बरकत.*

*अर्थ:- ज्या प्रमाणे आपली वागणूक असेल त्याचप्रमाणे आपल्याला फळ मिळते.*

             *दिनविशेष*     

*जागतिक अल्झायमर जागरुकता दिन*

*आंतरराष्ट्रीय शांतता दिन*

*या वर्षातील 264 वा दिवस आहे.*

    *महत्त्वाच्या घटना

*१९३४: ’प्रभात’च्या दामलेमामांनी इंदूरच्या सरदार किबे यांचे लक्ष्मी थिएटर भाड्याने घेऊन व थोडे सजवून ’प्रभात चित्रमंदिर’ या नावाने सुरू केले. ’प्रभात’चाच ’अमृतमंथन’ हा तिथे प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट होता. यानंतर कराड, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर, मद्रास अशा अनेक ठिकाणी ’प्रभात’ नावाची चित्रपटगृहे निघाली.*

*१९४२: दुसरे महायुद्ध – युक्रेनमधे नाझींनी २८०० ज्यू लोकांची हत्या केली.*

*१९४९: मणिपूर येथील रियासतेचे भातात विनिलीकरण करण्याच्या महत्वपूर्ण कागदपत्रे ट्रिटी ऑफ एक्शन हस्ताक्षरीत करण्यात आली.*

*१९६१: अमेरिकन रोटरक्राफ्ट कंपनी व्हर्टोल यांनी विकसित केलेलं हेवी-लिफ्ट बोईंग सी. एच ४७ चीणूक हेलिकॉप्टर ने आपली पहिली उड्डाण भरली होती.*

*१९६४: माल्टा हा देश (युनायटेड किंग्डमपासुन) स्वतंत्र झाला.*

*१९६८: रिसर्च अँड अ‍ॅनॅलेसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेची स्थापना झाली.*

*१९७१: बहारिन, भूतान आणि कतार या देशांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश*

    *जन्मदिवस / जयंती*

*१८८२: भारतीय महानगर ग्वेर्घगीस इवानीयो यांचा जन्म. (मृत्यू: १५ जुलै १९५३)*

*१९०२: पेंग्विन बुक्स चे संस्थापक ऍलन लेन यांचा जन्म. (मृत्यू: ७ जुलै १९७०)*

*१९०९: घाना देशाचे पहिले अध्यक्ष घवानी एनक्रमाह यांचा जन्म. (मृत्यू: २७ एप्रिल १९७२)*

*१९२६: ’मलिका-ए-तरन्नुम’ नूरजहाँ ऊर्फ अल्लाह वसई – पाकिस्तानी गायिका आणि अभिनेत्री (मृत्यू: २३ डिसेंबर २००० – कराची, सिंध, पाकिस्तान)*

*१९२९: पं. जितेंद्र अभिषेकी – शास्त्रीय गायक, संगीतकार व शास्त्रीय संगीताचे अभ्यासक (मृत्यू: ७ नोव्हेंबर १९९८)*

*१९३९: भारतीय तत्त्वज्ञानी, शैक्षणिक आणि राजकारणी अग्निवेश यांचा जन्म.*

*१९४४: राजा मुजफ्फर अली – चित्रपट निर्माते, कवी, कलाकार आणि सामाजिक कार्यकर्ते*

*१९७९: ख्रिस गेल – जमैकाचा क्रिकेटपटू*

*१९८०: करीना कपूर – अभिनेत्री*

*१९८१: रिमी सेन – अभिनेत्री*

      *मृत्यू / पुण्यतिथी*

*१७४३: सवाई जयसिंग – जयपूर संस्थानचा राजा (जन्म: ३ नोव्हेंबर १६८८)*

*१७९७: औध चे नवाब शुजा-उद-दौला यांचा मुलगा आसफ-उद-दौला यांचे निधन.*

*१९८२: सदानंद रेगे – मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक (जन्म: २१ जून १९२३)*

*१९९२: ताराचंद बडजात्या – चित्रपट निर्माते [राजश्री प्रॉडक्शन्स] (जन्म: १० मे १९१४)*

*१९९८: फ्लॉरेन्स ग्रिफिथ जॉयनर – अमेरिकेची धावपटू (जन्म: २१ डिसेंबर १९५९)*

*२०१२: गोपालन कस्तुरी – पत्रकार, ’द हिन्दू’ चे संपादक (जन्म: १७ डिसेंबर १९२४)*

         *सामान्य ज्ञान

*उर्जेचा नैसर्गिक स्रोत कोणता आहे ?*

*सूर्य*

*पंजाब केसरी म्हणून कोणाला ओळखले जाते ?*

*लाला लजपतराय*

*महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कोठे आहे ?*

*सातारा*

*सर्वात जास्त सहकारी साखर कारखाने असलेला जिल्हा कोणता ?*

*अहमदनगर

*वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे असते ?*

*नायट्रोजन*

           *बोधकथा

 *परिस

एक माणूस परीस शोधायला निघाला. त्यासाठी रस्त्यात जो दगड येईल तो घ्यायचा, गळ्यातल्या साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा असा त्याचा दिनक्रम सुरू झाला दिवस गेले. महिने लोटले, वर्षे सरली. पण त्याच्या दिनक्रमात बदल झाला नाही . दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि मग तो फेकून द्यायचा.शेवटी तो माणूस म्हातारा झाला आणि ज्या क्षणि तो आपले शेवटचे श्वास मोजत होता त्यावेळी अचानक त्याचे लक्ष त्याच्या गळ्यातील साखळीकडे गेले. ती साखळी सोन्याची होती. दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा या नादात त्याचे साखळीकडे लक्षच गेले नाही.

*तात्पर्य:-*

*प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी परीस येत असतो…कधी आई- वडिलांच्या रूपाने, तर कधी भाऊ-बहीनीच्या नात्याने…तर कधी मित्राच्या मैत्रिणीच्या नात्याने ….. कोणत्या ना कोणत्या रूपात तो आपल्याला भेटत असतो… आणि आपल्यातल्या लोखंडाचे सोने करीत असतो…… आपण जे काही असतो किवा बनतो त्यात त्यांचा बराच हातभार असतो …….*

*श्री. देशमुख. एस. बी*

*सचिव*

*नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ*

 *कार्यवाह – नाशिक जिल्हा T.D.F.*

*सौ. सविता एस देशमुख

*उपशिक्षिका पाताळेश्वर माध्य. विद्यालय पाडळी, ता -सिन्नर जिल्हा- नाशिक.*

 *7972808064* 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here