पुण्यातील ठोंबरे टोळीवर मोक्काची कारवाई

0

पुणे, मों.श.जाफरी : पुण्यातील शेखर ठोंबरे  व त्याच्या टोळीला अटक करून पोलिसांनी मोक्का अंतर्गत त्यांच्यांवर कारवाई केली आहे. ही कारवाई भारती विद्यापीठ पोलिसांनी केली असून यामध्ये पाच आरोपींना अटक करून तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
टोळी प्रमुख चंद्रशेखऱ उर्फ शेखर विठोबा ठोंबरे (वय24 रा.कात्रज), साथीदार अझरुद्दीन उर्फ अझहर दिलावर शेख (वय 22 रा.कात्रज), जावेद मेहबूब मुल्ला (वय 27 रा.कात्रज), इशान निसार शेख (वय 20 रा. कात्रज), तौफीक लाला शेख (वय 29 रा.कात्रज) व तीन अल्पवयीन मुले यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

त्यामुळे पोलिसांनी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शहरात अस्तित्वात असलेल्या टोळ्यांचा बिमोड करण्यासाठी काढलेल्या आदेशानुसार ठोंबरे व त्याच्या टोळीला अटक करत एकूण आठ जणांवर महाराष्ट्र गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई केली आहे. याचा पुढिल तपास स्वारगेट विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण करत आहेत 

<p>पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरील सर्व आरोपी हे भारती विद्यापीठ पोलिसांच्या  रेकॉर्डवर होते. ठोंबरे व त्याचे साथीदार हे संघटीतपणे कात्रज व आसपासच्या परिसरात टोळीचे साम्राज्य वाढविण्यासाठी खूनाचा प्रयत्न करणे, मारामारी, शस्त्र बाळगणे, दरोडा, दुखापत करणे, गैर कायद्याची मंडळी जमवणे असे गुन्हे करत होते. पोलिसांनी वेळोवेळी कारवाई करूनही त्यांनी गुन्हेगारी थांबवली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here