पैठण औरंगाबाद रोडवर अपघातात एक ठार एक जखमी

0

पैठण,दिं.२९ : खड्डे चुकविण्याच्या नादात औरंगाबाद येथील २४ वर्षीय तरूणाचा एसटी बसला धडक देत मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार(ता.२८) रोजी पैठण-औंरगाबाद महामार्गावरील ईसारवाडी येथे घडली.

   या बाबत एम आय डी सी पैठण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवार रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास शेख मतीन शेख अजीज (वय २४) व शेख मुबीन शेख अजिज (वय २८) दोघेही राहणार मिसारवाडी औरंगाबाद हे दोघे  औरंगाबाद येथून दुचाकी क्रं महा २०.जी.जी.२४५३ वर शेवगाव कडे जात असताना पैठण-औरंगाबाद महामार्गावरील ईसारवाडी शिवारातील हॉटेल शालीमार समोर असलेल्या मोठ-मोठे खड्डे चुकविण्याच्या नादात त्याचवेळी औरंगाबाद येथून पैठण कडे एसटी बस क्रं महा.१४.बीटी.१९६१ हि जात असताना यास दुचाकीस्वार शेख मतीन शेख अजीज याची जोराची धडक झाल्याने तो गंभीर जखमी झाला व शेख मुबीन शेख अजिज हा जखमी झाला. या अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पैठण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमीस खाजगी वाहनाने औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान शेख मतीन शेख अजिज याचा मृत्यू झाला. या प्रकरणी  एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास फौजदार अशोक चौरे , जमादार करतारसिंग सिंगल, राहूल महोतमल, दिनेश दाभाडे सह आदी करीत आहेत.

———–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here