प्रतिष्ठान रास दांडियास महिलांचा मोठा प्रतिसाद.

0

पैठण,दिं.२९: पैठण शहरात प्रथमच सुरज राजेंद्र लोळगे माजी नगराध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष यांनी आयोजित केलेल्या प्रतिष्ठान रास दांडिया २०२२ च्या निमित्ताने श्री नाथ हायस्कूल येथे बुधवार दिं.२८ रोजी”चला हवा येऊ द्या” या कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी पैठण शहरातील महिला सह पुरुष,युवक,युवती यांनी प्रचंड प्रतिसाद देत कार्यक्रम भर पावसात बघितला.

सदरील कार्यक्रमास भोकरदनचे आमदार संतोष दानवे,माजी राज्यमंत्री अनिल पटेल,माजी नगराध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुरज लोळगे, डॉ जयवंत जोशी, किशोर चव्हाण, डॉ विष्णू बाबर, डॉ राका,प्रा संतोष गव्हाणे, तुषार पाटील विकास पहाडे,लक्ष्मण औटे,समिर शुक्ल, विशाल पोहेकर, संदीप लोहारे, सिध्दार्थ परदेशी, संकेत सुर्यनारायण,प्रसाद लोळगे, वैभव पोहेकर,रूपेश जोशी सह आदी उपस्थित होते.

    यावेळी ‘चला हवा येऊ द्या”मधील भाऊ कदम,श्रेया बुगडे,कुशल बद्रीके, अंकुश वाढवे,स्नेहल सिंदम यांनी विविध प्रात्यक्षिके दाखवुन उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली तर सायंकाळी कार्यक्रम प्रसंगी झालेल्या जोरदार पाऊसात सुध्दा उपस्थित प्रेषकांनी कार्यक्रमांचा आनंद लुटला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here