महिला सशक्तिकरणाचा मार्ग म्हणजे महिलांचे निरोगी आरोग्य  – राजश्री मालेगावकर 

0

संगमनेर :  महिला सशक्तिकरणाचा मार्ग म्हणजे महिलांचे निरोगी आरोग्य असून प्रत्येक महिलेने स्वतःच्या आरोग्याबाबत जागरूक आणि सजक राहणे अत्यंत गरजेचे आहे.संपूर्ण कुटुंबाची काळजी घेणारी महिला ही सशक्त आणि निरोगी असल्यास त्याचा फायदा संपूर्ण कुटुंबाला होतो. यासाठी सर्वच महिला व मुलींनी आपल्या आरोग्याबाबत काळजी घ्यावी असे प्रतिपादन राजश्री मालेगावकर यांनी केले.        

           तालुक्यातील साकुर येथील रमेश फिरोदिया महाविद्यालयात विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास व राष्ट्रीय सेवा योजना यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या महिलांच्या आरोग्यविषयक समस्या व उपाय आणि रक्त तपासणी शिबिर प्रसंगी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.शिबिराचे उद्घाटन साकुरच्या सरपंच  सौ.नंदाताई खेमनर यांनी केले. यावेळी राजश्री मालेगावकर यांनी महिलांच्या आरोग्यविषयक वेगवेगळ्या समस्या उदा. विघटनशील सॅनिटरी, पिशवीचा कॅन्सर, इत्यादी बाबत सखोल मार्गदर्शन व चर्चा केली. या कार्यक्रमात येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.अनुराधा खेमनर यांनी महिलांचा सकस आहार, हिमोग्लोबिन पातळी, रक्तदाब इत्यादी विषयी सखोल माहिती दिली. या मार्गदर्शनपर शिबिरात महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यींनींनी उस्फूर्त प्रतिसाद नोंदवला. त्याचबरोबर साकुर व साकुर पठार परिसरातील जवळपास ३०० महिला या शिबिरात सहभागी झाल्या होत्या. त्यांची हिमोग्लोबिन, रक्तगट, रक्तदाब व सीबीसी चाचणी करण्यात आली. या मार्गदर्शनपर शिबिरास प्रमुख अतिथी म्हणून सौ. सविता दीपक फिरोदिया, हिवरगावच्या सरपंच सुप्रियाताई मिसाळ,  प्राचार्य डॉ.सचिन घोलप उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.प्राची भोर यांनी केले. तसेच सूत्रसंचालन प्रा.प्राजक्ता बिडवे यांनी तर पाहुण्यांची ओळख प्रा.कल्पना शेळके यांनी करून दिली. आभार प्रा.स्नेहल भागवत यांनी मानले. या कार्यक्रमाप्रसंगी उपप्राचार्य रंजीत गिरी, आय.क्यू.ए.सी समन्वयक प्रा. गणेश कुलकर्णी, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा.म्हतु खेमनर, सांस्कृतिक कार्यक्रम अधिकारी प्रा.दत्तात्रय आसवले, तसेच प्रा. राजेंद्र लेंडे  सहीत सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here