पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे; रयत शिक्षण संस्थेचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, पुणे यांचे कवयित्री बहिणाबाई चौधरी वाङ्मय मंडळ व स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने " रयतेचा हुंकार : गझल " या गझल मुशायाऱ्याचे आयोजन शनिवार १७ सप्टें. २०२२, वेळ: सायं.: ४.०० वा. करण्यात आले आहे. या गझल मुशायाऱ्याचे उद्घाटन : प्रा. मिलिंद जोशी (कार्याध्यक्ष, मसाप) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. प्रा. डॉ. विजय खरे (अधिष्ठाता,सा.फु.पुणे विद्यापीठ), मा. प्रकाश पायगुडे (प्रमुख कार्यवाह, मसाप), मा. सुनिताराजे पवार (कोषाध्यक्ष, मसाप) कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर गझल मुशायार्याचे अध्यक्ष डॉ. अविनाश सांगोलेकर असणार आहेत. स्वागताध्यक्ष: प्राचार्य डॉ. अरुण आंधळे तर निमंत्रक : डॉ. स्नेहल तावरे, विशेष उपस्थिती : मा. विशाल मासुळकर असतील. पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरातील नामवंत गझलकार या गजल मुशाऱ्यात सहभागी होणार आहेत. त्यापैकी सहभागी गझलकार मा.म.भा. चव्हाण, मा. दीपक करंदीकर, मा.चंद्रकांत धस, मा. राजेंद्र शहा, मा. मसुद पटेल, मा. रघुनाथ पाटील, मा.मीना शिंदे, मा. डॉ. शंतनू चिंधडे, मा. संध्या पाटील, मा. सुधीर कुबेर, मा.विजय वडवेराव, मा. वैशाली मोहिते, मा. प्रशांत पोरे, मा. दिनेश भोसले, मा.अनिल नाटेकर, मा. प्रदीप गांधलीकर, मा.वर्षा जोशी, मा. सुहास घुमरे, मा. अमोल अहेर इत्यादी गझलकार या गझल मुशायऱ्यामध्ये सहभाग घेणार आहेत.
या कार्यक्रमाचे संयोजन प्रा. डॉ. प्रभंजन चव्हाण, प्रा. डॉ. सविता पाटील,डॉ. धनंजय भिसे यांनी केले आहे.तर कार्यक्रम हा ‘कुसुमाग्रज काव्यकट्टा’, रयत शिक्षण संस्थेचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंध, पुणे-६७ येथे संपन्न होणार आहे. तरी गझलप्रेमी, गझलअभ्यासक आणि रसिक प्रेक्षक यांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. असे प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, प्रा.डॉ. प्रभंजन चव्हाण यांनी आवाहन केले आहे.