‘राजकारणातील कटुता संपवा’ उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना आवाहन

0
उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस

फडणवीसांना आवाहन

शिंदे सरकार आल्यानंतर भाजपा आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) यांच्यातील संघर्ष टोकाला गेल्याचं पहायला मिळालं. महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेनंतर सुरू झालेला हा तीव्र संघर्ष ठाकरे सरकार कोसळल्यानंतरही कायम आहे. परंतु आता शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना साद घातली आहे.

राजकारणातील कटुता संपवा असं आवाहन ठाकरे गटाकडून फडणवीसांना करण्यात आलं आहे.

शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून हे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आलं आहे. काय होईल असं जर-तर राजकारणात चालत नाही. महाराष्ट्राची एकोप्याची परंपरा कायम रहावी या फडणवीसांच्या मताशी आम्ही सहमत आहोत, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

ते पुढे लिहितात, ‘नोपिलयन, सिकंदरही कायम राहिले नाहीत. राम-कृष्णही आले आणि गेले. तिथे आपण कोण? फडणवीस, तुमच्या मनात आलेच आहे तर कटुता संपवण्याचा विडा उचलाच! लागा कामाला!’ असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here