राशी भविष्य 01/10/022; वृषभ :- आपल्या दिवसाला गती देणारे कार्य घडेल.

0

मेष :- बरेच दिवसांपासून राहिलेली कामे पूर्ण होतिल. दिवस सत्कारणी लावल्याचा आनंद मिळेल. उत्तम आरोग्यदायी दिवस. काहीतरी वेगळे करण्याचा विचार मनात येईल. मेहनतीचे योग्य फळ मिळेल.

वृषभ :- आपल्या दिवसाला गती देणारे कार्य घडेल. प्रशंसेस पात्र व्हाल. मिळकतीच्या क्षेत्रातील समस्या दीर होतील. घरातील कामात गुंग व्हाल. तुमच्यात सकारात्मक बदल घडून येतील.

मिथुन :- घरासाठी नवीन खरेदी केली जाईल. विद्यार्थ्यांना नवीन कार्य करण्याची संधी मिळेल. कार्यालयातील वातावरण अनुकूल राहील. आरोग्यात सुधारणा होईल. कौटुंबिक समस्या सामंजस्याने हाताळा.

कर्क :- आपल्या कालगुणांना वाव मिळेल. व्यवसायात जपून निर्णय घ्या. मनाची चलबिचलता जाणवेल. भावनिक गुंता वाढवू नका. सारासार विचार करण्यावर भर द्यावा.

सिंह :- सामाजिक कामासाठी वेळ द्याल. जोखीम पत्करून काम कराल. स्थावर खरेदी-विक्रीचे व्यवहार पुढे सरकतील. कौटुंबिक गोष्टी सुरळीत पार पडतील. जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल.

कन्या :- समोरच्या व्यक्तीची समजूत काढावी लागेल. दैनंदिन कामात बदल करून पाहावं. व्यापारी वर्ग खुश राहील. जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.

तूळ :- आर्थिक व्यवहारात संभ्रम टाळावा. अपुर्‍या ज्ञानावर ठाम मत वर्तवू नका. बोलण्याची घाई करू नका. कौटुंबिक वातावरणाकडे लक्ष ठेवा. नियोजित कामात बदल करू नका.

वृश्चिक :- मानसिक स्वास्थ्य जपावे. विचारांना योग्य दिशा द्यावी. प्रिय व्यक्तिला दुखवू नका. मित्राची योग्य साथ मिळेल. गरजूंना मदत कराल.

धनू :- कोणावरही चटकन विश्वास ठेऊ नका. दिवसाचा बराच काळ कामात गुंतून राहाल. भावंडांशी नाते दृढ होईल. वडीलधार्‍यांचे मार्गदर्शन घ्यावे. विवाह इच्छुक मंडळींना नवीन स्थळे येतील.

मकर :- बरेच दिवस राहून गेलेले काम पूर्ण होईल. मित्रांशी वाद संपुष्टात येतील. मानसिक शांतता लाभेल. अति कर्मठपणे वागू नका. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.

कुंभ :- करमणुकीत बराच काळ घालवाल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आपली प्रतिमा जपावी. घरातील सदस्यांचा सल्ला घ्यावा. वादाचे मुद्दे दुर्लक्षित करा.

मीन :- घराची कामे मार्गी लागतील. अचानक धनलाभ संभवतो. रागावर ताबा ठेवावा. ज्येष्ठ व्यक्तीचा आशीर्वाद लाभेल. इच्छा नसताना प्रवास करावा लागेल. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here