वर्दीतील स्त्रीशक्ती :महिला पोलीस वैशाली मलबादी (चौगुले )

0

कवठेमहांकाळ प्रतिनिधी :

नवरात्र म्हणजे नऊ दिवस चालणारा स्त्रीशक्तीचा उत्सव.कोरोनाच्या लढ्यात आमच्या पोलीस दलातील स्त्रीशक्तीने कर्तव्यापलीकडे जाऊन सामाजिक जाणिवेतून उल्लेखनीय काम केले आहे.

त्या स्त्री शक्तीचा सन्मान व गौरव करण्याचा हा छोटासा प्रयत्न…. 

भक्ती-शक्ती व कृषी संस्कृतीचे प्रतीक असणारे नवरात्रीचे मंगल पर्व सुरु झाले आहे.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दलातील स्त्रीशक्तीच्या कार्याचा यथोचित गौरव करणे गरजेचे वाटते. 

सांगली मुख्यालय येथे कर्तव्य असणाऱ्या सौ वैशाली मलबादी (चौगुले)  या 2014 साली महाराष्ट्र पोलीस दलात भरती झाल्या ऑन ड्युटी 24 तास कर्तव्यावर असतात जिल्ह्यातून गोरगरीब न्याय मागण्यासाठी मुख्यालया येथे अर्ज करण्यासाठी जात असतात त्यांच्या समस्या समजावून घेऊन 

 स्वागत कक्ष ला ड्युटीवर  असतात  पोलीस अधीक्षक  सो यांना भेटण्यासाठी येणारे सांगली जिल्हातील सर्व व्हिसिटराना त्यांच्य अडचण ऐकून घेणे. त्यांना मदत करणे पोलीस अधीक्षक सो यांना भेटावणे.त्यांच्या समाधान करणे.व तक्रारीचे दखल  घेणे जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनला कळवणे व वरिष्ठ अधिकारी यांना कळवणे असे PRO म्हणून काम करत असतात.तक्रार निवारण झालेकी नाही चेक करणे.

आँँन ड्युटी २४ तास काम करत ह्या २४ तास ड्युटीबरोबरच त्या वर्दीतील आई आहेत.मालबादी ह्या कामावर असताना आपल्या मुलाशी व्हिडिओ कॉल करुन बोलतात.त्या कामावर असताना मुलांना पती व सासुबाई सांभाळ करतात.

त्या कुटुंबाकडे लक्ष देऊ शकत नाहीत.आम्ही जनतेच्या सेवेसाठी नेहमीच सज्ज आहोत असे महिला पोलीस वर्दीतील दुर्गा वैशाली मलबादी (चौगुले)  यांनी सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here