वाढदिवसानिमित्त विविध मान्यवरांनी दिल्या रोहित घरत यांना शुभेच्छा.

0

उरण दि 19(विठ्ठल ममताबादे )कामगार नेते तथा काँग्रेस रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराजदादा मोरे यांनी रायगड जिल्ह्यातील उरण विधानसभा अध्यक्ष रोहित घरत यांच्या वाढदिवशी शेलघर येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी कुणालशेठ घरत, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष निखिल डवळे व इतर पदाधिकारी व मित्र परिवार तसेच विवेक म्हात्रे,उरण तालुका युवक इंटक अध्यक्ष राजेंद्र भगत, उरण तालुका NSUI अध्यक्ष आदित्य घरत, उलवे नोड युवक अध्यक्ष मयुरेश घरत आदि पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी प्रत्यक्ष तसेच इतर पदाधिकारी कार्यकर्ते, मित्र परिवार, नातेवाईकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून रोहित घरत यांना शुभेच्छा दिल्या आहेत.उत्तम वक्ता, काँग्रेस पक्षाचा एकनिष्ठ व प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून रोहित घरत यांची जनमानसात ओळख आहे. त्यामुळे त्यांच्या गाठीभेटी घेऊन विविध मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.