शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या वाहतूक संघटनेच्या उरण तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर.

0

माजी आमदार  मनोहरशेठ भोईर यांच्या शुभहस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप.

उरण दि २३(विठ्ठल ममताबादे ) : भारतीय कामगार संघटनेच्या वाहतूक विभागातर्फे  उरण तालुक्यातील वाहतूक संघटनेच्या  उरण विधानसभा अध्यक्ष  करण चंद्रहार पाटील यांनी नियुक्त्या जाहीर केल्या, त्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रायगड जिल्हाप्रमुख व माजी आमदार  मनोहरशेठ भोईर यांच्या शुभहस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.यामध्ये उरण विधानसभा उपाध्यक्षपदी  सौरभ दत्ताराम पाटील, जासई विभाग अध्यक्षपदी अतुल नामदेव मढवी व नवघर विभाग अध्यक्षपदी संतोष नामदेव पाटील यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या, यावेळी माजी आमदार  मनोहरशेठ भोईर यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व वाहतूक संघटनेबरोबर शिवसेना पक्षाचा कार्य पण आपल्या हातून घडावं अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी उरण विधानसभा संपर्कप्रमुख  महादेव घरत, द्रोणागिरी शहरप्रमुख  जगजीवन भोईर, उरण विधानसभा वाहतूक अध्यक्ष  करण पाटील, उरण विधानसभा सोशल मीडिया समन्वयक  नितीन ठाकूर, उपशहरप्रमुख प्रतीक पाटील,  तालुका उपसंघटिका मनीषा ठाकूर, तालुका उपसंघटिका सुजाता पाटील, शिक्षक नेते  कौशिक ठाकूर व शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.योग्य अशा व्यक्तींची निवड झाल्याने जनतेतून आनंद व्यक्त होत आहे.नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here