कोपरगाव : मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गावरील कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारातून जाणाऱ्या गाव रस्त्यांवरील भुयारी मार्गाचे डक अतिवृष्टीमुळे पूर येऊन परिसरातील शेतामध्ये पाणी शिरल्याने पिकाचे प्रचंड नुकसान झाले . त्याचप्रमाणे रस्ते बंद झाल्याने संपूर्ण गावाचा संपर्क तुटला होता. या झालेल्या नुकसानीची त्वरित भरपाई मिळावी अन्यथा आम्ही कोकमठाणचे ग्रामस्थ समृद्धी महामार्गाच्या पुलावरून उड्या मारून आत्महत्या करू असा इशारा प्रशासनाला ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे. अतिवृष्टीने झालेल्या पिकांचा पंचनामा करून १०० टक्के नुकसान भरपाई मिळावी. त्याचप्रमाणे समृद्धी महामार्गावरील भुयारी मार्गाचे डक त्वरित दुरुस्ती करावी . अन्यथा महामार्गाच्या सर्कलचे कामकाज बंद करावे असा ठराव कोकमठाण ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेऊन संमत केला आहे. याबाबतचे निवेदनही आज ग्रामस्थांच्या वतीने कोपरगावच्या तहसीलदारांना देण्यात आले . याबाबत प्रतिक्रिया देताना भाजपचे उप जिल्हा अध्यक्ष शरद थोरात म्हणाले की समृद्धी महामार्गाखालून जणाऱ्या भुयारी रस्त्यावर अत्यंत चुकीच्या पद्धतीने डक बांधल्यामुळे काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे कोकमठाण आणि परिसरातील या डक मध्ये अक्षरशः ८ ते १० फूट पाणी साचल्याने कोकमठाण शिवारचा इतर गावांशी संपर्क पूर्णपणे तुटला होता. महामार्ग बांधताना अधिकच पाऊस झाल्यास पाण्याचा निचरा न झाल्याने शेतीमध्ये पाणी शिरल्याने उभ्या पिकांचे नुकसान झाले. १०० टक्के नुकसान झालेले असताना महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी पंचनामे करताना अवघे ४० ते ५० टक्के नुकसान झाल्याचे कळवले आहे. हे चुकीचे पंचनामे बदलून १०० टक्के नुकसान भरपाई मिळावी तसेच सदरील डकची त्वरित दुरस्ती न कळल्यास शासनास जग आणण्यासाठी आम्ही समृद्धी महामार्गाचे काम बंद पाडू. यावेळी कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संभाजी रक्ताटे,कर्मवीर काळे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सुधाकर रोहम. नंदकुमार पवार आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
Home महाराष्ट्र समृद्धी महामार्गातील डक दुरुस्ती आणि शेतीची नुकसान भरपाईसाठी कोकमठाणच्या शेतकऱ्यांचा आत्महत्येचा...