गावाच्या विकासात ग्रामस्थांचा सहभाग असला तरच गावाचा विकास होतो;केंद्रिय प्रधान सचिव सुनील कुमार
देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील गुहा या गावाची स्मार्ट व्हिलेजसाठी माजी मंञी प्राजक्त तनपुरे यांनी निवड केली होती.या गावाचा विकास आराखडा प्रस्तावाद्वारे सादर करण्यात आला होता.पंचायतराज व ग्रामविकासचे केंद्रीय प्रधान सचिव यांच्यासह कमिटीने गुहा गावाची पाहणी करुन गावाच्या विकासात प्रत्येक व्यक्तीचा सहभाग असला तरच गावाचा विकास होतो.असे मत पंचायत राज मंत्रालय केंद्रिय प्रधान सचिव सुनील कुमार यांनी व्यक्त केले.
राहुरी तालुक्यातील गुहा या गावाची स्मार्ट व्हिलेज साठी निवड झालेली होती. गेल्या दोन वर्षात कोरोना मुळे या गावाची पाहणी करण्याचे राहिले होते. शनिवार दि.24 सष्टेबर रोजी केंद्रिय प्रधान सचिव सुनील कुमार यांच्यासह पुणे येथिल यशदाचे संचालक कलशेट्टी,मुंबई येथिल जेजे स्कूल ऑफ आर्किटेक्चर काँलेजचे प्राचार्य राजु मिश्रा,जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर,उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे,प्रांताधिकारी अनिल पवार,तहसीलदार फैसोउद्दीन शेख,गटविकास अधिकारी बाळासाहेब ढवळे,सहाय्यक गटविकास अधिकारी अनंत परदेशी आदींनी पाहणी करुन ग्रामस्थांना स्मार्ट व्हिलेज बाबत मार्गदर्शन करताना केंद्रिय प्रधान सचिव सुनील कुमार बोलत होते.
यावेळी बोलताना सुनील कुमार म्हणाले की,स्मार्ट व्हिलेसाठी निवड झालेल्या गुहा गावास कोरोनामुळे समक्ष भेट देता आली नाही.जे प्रस्तावात दिले आहे. त्याच्यापेक्षा वेगळे काहीच सांगत नाही.मुंबई येथिल जेजे स्कूल ऑफ आर्किटेक्चर काँलेजने प्रत्यक्ष पाहणी करुन जो प्रस्ताव तयार केला.राष्ट्रीय महामार्ग आहे म्हणून हाँस्पीटलची गरज आहे.याचा अर्थ येथिल प्राथमिक आरोग्य केंद्र चांगले काम करीत नाही का? संभवना तयार करताना समस्या निर्माण होतात.गावाचा विकास करताना प्रत्येक नागरीकाचा सहभाग महत्वाचा असतो.मिनरल वाँटर व पाणी योजना कार्यान्वित होणे गरजेचे आहे. पिण्याच्या पाण्याची तपासणी वेळेवर होणे गरजे आहे.स्वच्छता बाबतीत काम करणे आवश्यक आहे.हागणदारी मुक्त योजना,स्वच्छता बाबतीत कचरा गोळा करताना कचरा विलगिकरण होणे गरजेचे आहे.कचऱ्या पासुन खत निर्मिती करुन ग्रामपंचायतने त्याची विक्री करुन पैसे कमवले पाहिजे.बंदिस्त गटारीत लोकसहभाग महत्वाचा आहे.सौर उर्जातून विज निर्मिती केली पाहिजे.हिरवे बाजार प्रमाणे सौर उर्जा निर्मिती करुन शेती पंपाची विज भागवून उर्वरीत विजेची विक्री करुन ग्रामपंचायतने पैसे कमवले पाहिजे.आठ वर्षाचा विकास आराखडा तयार केला पाहिजे.मुंबई येथिल जेजे स्कूल ऑफ आर्किटेक्चर काँलेजने तयार केलेल्या आराखड्या नुसार चेहरा मोहरा बदलायचा आहे.असे सुनील कुमार यांनी सांगितले.
स्मार्ट व्हिलेज पाहणीसाठी आलेल्या कमिटीच्या स्वागत सत्कारा प्रसंगी प्रास्ताविक भाषणात शिर्डी संस्थानचे विश्वस्थ सुरेश वाबळे म्हणाले की,गुहा गावाच्या दुष्ट्रीने मोठा आनंदाचा दिवस आहे.ना.प्राजक्त तनपुरे यांनी जिल्ह्यातील दोन गावे स्मार्ट व्हिलेजसाठी निवडले होते. स्मार्ट व्हिलेज प्रस्ताव दाखल केल्या नंतर गुहा गावाची केंद्रीय स्तरावर निवड झाली. त्याची पाहणी करण्यासाठी केंद्रीय प्रधान सचिव व कमिटी आली आहे.राष्ट्रीय महामार्गामुळे गुहात हास्पीटलची आवश्यकता आहे.शाळा जुन्या अवस्थेतील आहे.स्पर्धा परीक्षेसाठी चांगल्या वाचनालयाची निर्मिती करणे गरजेचे आहे.असे वाबळे यांनी सांगितले.
यावेळी प्राचार्य राजु मिश्रा, आशिष येरेकर,यशदाचे संचालक कलशेट्टी आदींनी मार्गदर्शन केले.
संरपंच उषा चंद्रे,उपसरपंच रामा बर्डे,माजी सभापती मनिषा ओहोळ,गुहा विका सोसायटीचे चेअरमन राजेंद्र कोळसे प्रेरणा पतसंस्थेचे व्हा.चेअरमन मच्छिंद्र हुरूळे, विष्णूपंत वरपे, वैद्यकीय अधिकारी डॉ गायकवाड, सुजित वाबळे, नाना चंद्रे आदी उपस्थित होते.
आभार प्रदर्शन उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे यांनी तर सुञ संचालन निखिल कराळे यांनी केले