जामखेडला आम आदमी पार्टीच्या वतीने डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात  साजरी

0

जामखेड तालुका प्रतिनिधी :- जामखेड शहरात भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त आम आदमी पार्टी जामखेड तालुका यांचे वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज,  डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जंयती निमित्त ज्येष्ठ नागरिक शिवदास आव्हाड ,भागवत हजारे  यांच्या हस्ते  प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले .

छत्रपती शिवाजी महाराज की जय, डॉ. महामानव बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, महात्मा फुलेंचा विजय असो, पुण्यश्लोक अहिल्यादेवीचा विजय असो. अशा घोषणा देऊन सर्व महापुरुषांना अभिवादन करण्यात आले.यावेळी भारताचे संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.यावेळी आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष संतोष नवलाखा,संघटन मंत्री बजरंग सरडे, शहराध्यक्ष अजय भोसले, सहकार आघाडी संजय सदाफुले, सुंदर परदेशी, समीर मणियार,दिपक  शेळके,वाहन संघटनेचे मच्छिंद्र वायफळकर, सोमनाथ रोडे, शहाजी जरे, विनोद अवसरे,रियाज खान, बाळू शिखरे, सचिन शिंदे,बाळू तांबे,शिवराज डोके, ज्ञानेश्वर क्षिरसागर,संपत सर्वे, बबलू देशमुख, सचिन नवलाखा, सुशिल सदाफुले, काकासाहेब रायकर ,आदी कार्यकर्ते ,नागरिक  उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here