पैसा शिक्षकांच्या घामाचा.. चांदी मात्र अधिकारी आणि दलांलाची…

0

नाशिक : किती दुदैव त्या शिक्षकांचे २०१८ पासुन आणि कोवीड कालावधी संपल्या नंतरही २०२४ पर्यंत वैद्यकीय (मेडीकल) बीले, फरकाची बीले , रजा रोखीकरण ही बीले मंजुर करून घेण्यासाठी मुख्याध्यापक संघ, शिक्षक व शिक्षकेत्तर संघटना, शिक्षक आमदार किशोर भाऊ दराडे, पदविधर आमदार सत्यजीत तांबे यांनी पाठपुरावा करून वेळ प्रसंगी आंदोलन, मोर्चा ,उपोषण करून १६५ कोटीच्या बीलांना शिक्षण आयुक्त यांच्या कडून मंजुरी घेण्यासाठी ६ महिन्यांपासुन पाठपुरावा करणारे मुख्याध्यापक संघाचे राज्याचे सचिव एस बी देशमुख सर्व संघटनाचे पदाधिकारी यांना मेहनत घ्यावी लागली . असे असतानाही आपल्या हक्काच्या पैशापासून काही हेकेखोर आणि लालची अधिकारी या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेठीस धरत आहे. मात्र एखाद्या दलालास मध्यस्थी करावयास लावल्यास त्वरित बिले मंजूर केले जात असल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे.

पैसे २०२४ मध्ये जमाही झाले आणि संबधित विभागातील अधिकाऱ्यांचे नाटकं सुरू झाली . आपले उखळ पांढरे करून घेण्यासाठी प्रत्येक भागात दलाल तयार करून टक्केवारी सुरु करण्यात आली . जे स्वाभिमानी होते ते शिक्षक आमदार किशोरभाऊ दराडे व मुख्याध्यापक संघाकडे आले. त्यांना अधिकाऱ्यांशी संवाद साधुन बीले मंजुर करण्यास चालना दिली. आर्थिक व्यवहार कोणीही करू नये असे आवाहन शिक्षक -शिक्षेकेतर कर्मचाऱ्यांना केले, तसेच याबाबत कानउघाडणी करीत आमदार किशोर भाऊ दराडे यांनी संबधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सुचना दिल्या . असे असतानाही संबंधित अधिकाऱ्यांनी यास केराची टोपली दाखवली . म्हणुन मातोश्री इंजीनिअरींग कॉलेज ओढा (नाशिक ) येथे सर्व अन्यायग्रस्त व ६१६ शिक्षकांची अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे रखडलेली बीले तर २०० हुन अधिक शिक्षकांच्या बिलांना त्रुटी लागल्या या सर्व शिक्षक /शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन अधिकाऱ्यांची कान उघडनी केली. शिक्षण उपसंचालक डॉ .बी . बी . चव्हाण यांनीही शिक्षकांची बीले त्वरित काढण्याच्या सुचना दिल्या. निधी परत जाता कामा नये असे स्पष्ट आदेश दिले .

तरीही पे युनिट अधिक्षक नितीन पाटील यांच्या कार्यालयासमोर शेकडो शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी रात्री १० पर्यंत थांबुन होते . यातले गौडबंगाल मात्र समजलं नाही . दिवसा एक, रात्री दुसरचं अशी अवस्था शिक्षकांची निर्माण झाली याचा संपूर्ण आढावा मुख्याध्यापक संघाचे सचिव एस .बी देशमुख प्रदिप सांगळे, संजय चव्हान , सोमनाथ धात्रक ,संजय देवरे, मोहन चकोर ,एम के वाघ ,प्राचार्य बाबासाहेब खरोटे ,एम डी काळे व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला सर्व बीले मंजुर करून शिक्षकांच्या खाती त्वरित जमा करावी असे आदेश आमदार किशोरभाऊ दराडे यांनी दिले आहेत. यावर आता अधिकारी कशा प्रकारे प्रतिसाद देतात हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here