शनिवारी माजीमंत्री आ.यशोमती ठाकूर व रविवारी लेफ्टनल जनरल डॉ.माधुरी कानिटकर संगमनेरात

0

संगमनेर  : संगमनेरच्या सहकार पंढरीचे जनक, थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ.अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त  शनिवार (दि.२४) सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता माजी मंत्री आ. यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत महिला मेळावा होणार असून रविवार (दि.२५) सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉ.माधुरीताई कानिटकर व लीना बनसोड ह्या युवतींशी संवाद साधणार असल्याची माहिती सौ.दुर्गाताई तांबे व डॉ.जयश्रीताई थोरात यांनी दिली.

        काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे गटनेते तथा राज्याचे माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी अत्यंत उत्साहात व शानदार कार्यक्रमात जयंती महोत्सव संपन्न होत असतो. शुक्रवारी राजस्थानचे मुख्यमंत्री ना. अशोक गेहलोत, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ,  आ. बाळासाहेब थोरात, आ. डॉ.सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण होणार आहे.तर शनिवारी दुपारी १२ वा. माजी महिला व बालकल्याण विकास मंत्री आ. यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत महिला मेळावा होणार आहे. यावेळी महाराष्ट्रातील प्रसिद्ध युवा कीर्तनकार ह.भ.प.शिवानी ताई व मुक्ताताई चाळक यांच्या कीर्तनाची जुगलबंदी होणार आहे.तसेच रविवारी सकाळी १०.३० वा. संगमनेर तालुक्यातील व शहरातील युवतींना करियरसाठी मार्गदर्शन करण्याकरीता भारतीय लष्करातील अतिविशिष्ट सेवा पदक विजेत्या आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरीताई कानिटकर व नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड या उपस्थित राहणार आहेत. या दोन्ही कार्यक्रमांसाठी संगमनेर तालुक्यातील विविध महिला पदाधिकारी, बचत गटाच्या महिला, महाविद्यालयीन युवती,करिअर अकॅडमी मधील युवती व महिला भगिनींनी  मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन एकविरा फाउंडेशन व जयंती महोत्सव समिती आणि अमृत उद्योग समूहाच्या वतीने करण्यात आले आहे.

चौकट :- जयंती महोत्सवाची जय्यत तयारी
शेतकी संघाच्या प्रांगणात यशोधन कार्यालया शेजारी जयंती महोत्सव कार्यक्रमाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यासाठी भव्य दिव्य डोम उभारला असून यामध्ये सुमारे दहा हजार नागरिकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महिलांसाठी स्वतंत्र कक्ष तर पुरुषांसाठी स्वतंत्र कक्ष तयार केले आहेत. याचबरोबर पार्किंग व्यवस्था, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी भव्य दिव्य स्टेज, एलईडी व्यवस्था,साऊंड सिस्टिम यांसह सर्व अत्याधुनिक सिस्टीम सह सर्वत्र विद्युत रोषणाईने हा परिसर सजवला जात आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here