इंदापूरच्या तहसीलदारांवर अज्ञात हल्लेखोरांचा हल्ला

0

फलटण ग्रामिण : इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. यामुळे मोठा गोंधळ उडाला. इंदापूर चे तहसीलदार श्रीकांत पाटील हे आपल्या कार्यालयाच्या जवळ  तहसील कचेरी पासून  हाकेच्या अंतरावर  सरकारी गाडीतून जात असताना अज्ञाताने  मिरची पूड टाकून व लोखंडी राॅडने हल्ला करून  जीवे मारण्याचा प्रयत्न केला.यामध्ये श्रीकांत पाटील थोडक्यात बचावले. परंतु गाडीच्या काचा फोडून चालकाच्या अंगावर मिरची पावडर टाकून मारण्याचा प्रयत्न केला गेला. या बाबत सविस्तर माहिती अशी की आज ( दि२४) सकाळी ११ च्या दरम्यान तहसील कचेरीत आपल्या सरकारी सुमो गाडीतून (एम एच ४२ए एक्स १६६१ )जात असताना संविधान चौक येथे अज्ञात जमावाने गाडी अडवून लोखंडी रॉडसह गाडीवर जोरदार हल्ला केला व तहसीलदार यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. चालक यांच्या अंगावर मिरची पावडर टाकून मारण्याचा प्रयत्न केला परंतु यातून तहसीलदार यांच्यासह चालक थोडक्यात बचावले.
ही घटना पाहून आजूबाजूचे लोक धावून आल्याने तहसीलदार व चालक थोडक्यात बचावले यामध्ये गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.
या बाबत प्रतिक्रिया देताना तहसीलदार श्रीकांत पाटील म्हणाले कि अवैध धंद्याच्या विरोधात काम करताना अवैध धंदे करणार्या पासून अशा प्रकारे हल्ला होवू शकतो. या विषयी एफ आय आर दाखल करण्यात आली असून प्रांत अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी,  इंदापूरचे पोलिस निरीक्षक आणि आम्ही एकत्रित पणे बैठक घेऊन तपास कामी नियोजन करत आहोत.
सदरहू घटनेचे वृत्त समजताच प्रशासकीय भवन येथील कर्मचारी व अधिकारी यांनी काम बंद करून प्रशासकीय भवन येथे ठीय्या आंदोलन केले.
विविध मान्यवरांनी निषेध नोंदवला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या(शरदचंद्र पवार)राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रीया सुळे यांनी तहसीलदार श्रीकांत पाटील याच्याशी संपर्क साधून माहिती घेतली. शासकीय अधिकाऱ्यांवर हल्लेखोरांनी हल्ला करण्यापर्यंत जर मजल जात असेल तर राज्यातील  कायदा सुव्यवस्था परिस्थिती किती ढासळली आहे हे दिसून येते. अशा तीव्र शब्दात त्यांनी सदरहू घटनेचा निषेध नोंदवला.
आमदार दत्तात्रय भरणे यांना ही  घटनेची माहिती समजताच  तहसीलदार श्रीकांत पाटील यांची विचारपूस केली व हल्लेखोरांवर ताबडतोब कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलिस अधिकारी यांना दिल्या. पुढे बोलताना श्री.भरणे म्हणाले की तहसीलदार पाटील हे अतिशय प्रामाणिक अधिकारी आहेत त्यांच्यावर हल्ला होणे ही गंभीर बाब आहे.
त्याचप्रमाणे भाजपचे नेते  माजी मंत्री  व राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी सदरहू हल्ल्याच्या घटनेचा तीव्र निषेध केला.अशा घटना इंदापूर तालुक्यात घडत नव्हत्या.ही फार गंभीर घटना आहे. हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याच्या सुचना त्यांनी केल्याआहेत 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here