नोकरी आणि लग्नाचे आमीष दाखवून विवाहितेवर बलात्कार !

0

फलटण : येथील पतीपासून विभक्त रहाणार्‍या ३० वर्षीय महिलेच्या असाहाय्यतेचा अपलाभ घेऊन तिला लग्न करण्याचे आणि नोकरी लावण्याचे आमीष दाखवून धर्मांधाने तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे.
हा प्रकार डिसेंबर २०२२ ते १८ मे २०२४ या कालावधीत घडला आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून हैदर मेटकरी याच्यावर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पीडितेने आरोपीला ‘तू अशा किती मराठी मुलींचा वापर केला आहेस ?’ असे विचारले. तेव्हा धर्मांधाने ”मी गझवा-ए-हिंद महाराष्ट्रात सगळीकडे करणार आहे”, असे सांगितल्याचे पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे. (यातून धर्मांध नियोजनपूर्वक हिंदु महिला, मुली यांचे शोषण करत आहेत, हे लक्षात येते. – संपादक)

याविषयी फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला पतीपासून वर्ष २०२१ पासून विभक्त रहाते. त्यांचा न्यायालयामध्ये घटस्फोटाचा खटला चालू आहे. याचाच अपलाभ घेत धर्मांधाने अत्याचार केले. पीडितेने लग्न कधी करणार ? अशी विचारणा केली असता ‘तुला बुरखा घालावा लागेल, टिकली लावायची नाही, नमाज पढायचा’, असे म्हणून मारहाण केल्याचे आणि १५ मार्च २०२४ या दिवशी पीडित महिलेचा व्हिडिओ बनवून तो सामाजिक माध्यमावर प्रसारित करण्याची धमकी देऊन मारहाण आणि बलात्कार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here