सातारा 32 लाखाच्या सोने चोरीतील मुख्य आरोपीस राहुरी पोलीसांनी केल जेरबंद

0

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी

                   सातारा जिल्ह्यातील 32 लाख 06 हजार 700 रुपयाचे किंमतीचे 50 तोळे सोने चोरणारा मुख्य आरोपी राहुरी पोलीसांनी जेरबंद केला आहे.  सातार जिल्ह्यातील सातार शहर, वडुज,फलटण शहर कराड शहर, दहीवडी, कोरेगांव या बस स्थानकावर प्रवाशांच्या सोन्याच्या दागिन्याची एकुण 50 तोळे सोने किंमत 32 लाख 16 हजार 700 रुपये चोरी करणाऱ्या महीला नामे रुपाली अर्जुन सकट, गीता संदिप भोसले दोन्ही रा. जयसिंगपुर जि. कोल्हापुर यांच्याकडुन चोरीचे सोने घेणारा सहआरोपी  रफिक अजीज शेख रा. सांगली या तिघांना सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी अटक केली होती.

         गुन्ह्यातील मुख्य आरोपी नामे संदिप झुंबर भोसले (काळे) रा. संभाजीनगर, जयसिंगपुर ता. शिरोळ जि. कोल्हापुर हा गुन्हा घडल्यापासुन फरार झाला होता. सदर आरोपीची माहीती राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक  संजय ठेंगे यांना गोपनिय खबऱ्या मार्फत मिळाली. पो.नि. संजय ठेंगे यांनी तात्काळ राहुरी पोलीस स्टेशनच्या पोलीस पथकाला माहीती देऊन सदर ठिकाणी जाऊन खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले. राहुरी पोलीसांचे पथक  राहुरी रेल्वे स्टेशन येथे जाऊन मध्यप्रदेश राज्यात रेल्वेने फरार होणाऱ्या आरोपीस शिताफीने ताब्यात घेऊन विचारपुस केली असता आरोपीने सातारा जिल्ह्यात गुन्हे केल्याचे कबुल केले.सदर आरोपीस राहुरी पोलीस स्टेशनला घेऊन येऊन सातारा जिल्हा पोलीस यांच्याशी संपर्क करुन आरोपी संदिप झुंबर भोसले (काळे) रा. संभाजीनगर, जयसिंगपुर ता. शिरोळ जि. कोल्हापुर यास सातारा जिल्हा पोलीस पथकाच्या यांच्या ताब्यात दिले.

               जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर,पोलिस उपअधिक्षक डॉ.बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पो.उ.नि. चारुदत्त खोंडे, पो.हे.कॉ.राहुल यादव, पोना. प्रविण बागुल, पोकॉ. गोवर्धन कदम, पोकॉ. प्रमोद ढाकणे, पो.कॉ.गणेश लिपने, पो.काँ.नदिम शेख आदींनी केली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here