आंबळे येथे संयुक्त जयंती उत्साहात साजरी !

0

सातारा/अनिल वीर : जयभिम मित्र मंडळ, आंबळे,ता.पाटण यांच्यावतीने तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

     ध्वजारोहन व प्रतिमा पुजन  सोपान गंगावणे,सुदाम रोकडे, प्रकाश कांबळे व राहुल रोकडे यांच्या हस्ते करण्यात आले. बुध्दवंदना बौध्दाचार्य जयंत लोखंडे यांनी घेऊन जयभिम मित्र मंडळाचे अध्यक्ष विजय सत्वधीर, राजेद्र लोखंडे, जालिंदर वाघमारे, उत्तम पवार व सुभाष कांबळे यांनी मान्यवरांचा सत्कार केला.यावेळी लहान व मोठ्या गटांमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आले. महापुरुषांच्या प्रतिमांची रथातुन मोठ्या जल्लोशात गावामधुन मिरवणूक काढण्यात आली.यावेळी सरपंच रोहीत खरात,उपसरपंच अमोघ घाडगे, सचिन लादे,अक्षय घाडगे,राजु मोरे,चांगदेव घाडगे,सोमनाथ खरात,आशोक खरात, मोहन सुतार, भिमराव कृण्णात कांबळे,  सपकाळ आदी बहुसंखेने ग्रामस्थ उपस्थित होते.

    रमाईचा खेळ पैठनीचा किशोर धरपडे यांनी घेतला.पैठनी विजेत्या उज्वला सुर्वे खरात व इतरांना विविध बक्षीस वितरण करण्यात आले.सदरच्या कार्यक्रमास माया लोखंडे, सुमन भंडारे, कलावती सत्वधीर, छाया कांबळे, मनिषा मस्के, सोनिया लादे, द्वारका गंगावने, सुनिता पवार, भारती गायकवाड, निशा सत्वधीर, तेजस्वनी मस्के, शोभा कांबळे आदी महिला व कार्यकर्ते उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here