सातारा/अनिल वीर : भारतीय बौध्द महासभा मोरणा विभागातील कोकिसरे येथे धम्म प्रशिक्षणार्थी महिलांचे धार्मिक धम्म प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले आहे.
या शिबीरार्थीना विविध विषयांवर उदाहरणासह गोष्टीरुपात साध्या व माड्या भाषेत धम्म समजावून सांगण्यासाठी रायगड जिल्हा भारतीय बौध्द महासभेच्या आदर्श केंद्रिय शिक्षिका रत्नमाला जाधव कोकिसरे येथे राहून धम्मप्रसार प्रचारार्थ महान कार्य करत आहेत.या शिबीराचे उद्घाटक आणि मार्गदर्शक एन. एम. आगाणे (काका),पाटण तालुका शाखा संस्कार विभाग उपाध्यक्ष दगडू तांदळे (हिशोब तपासणीस), ऍड.राहुल आबासाहेब भोळे आदींनी मार्गदर्शन केले.याकामी,रविंद्र बनसोडे,अनिल बनसोडे,भागवत बनसोडे, सावळाराम बनसोडे व महिला मंडळाने अथक असे परिश्रम घेतले.