गौतम बुद्ध हे मानसशास्त्रीय विश्लेषक व विज्ञानाचे पुरस्कर्ते : ऍड.हौसेराव धुमाळ

0

सातारा/अनिल वीर : गौतम बुद्ध हे मानसशास्त्रीय विश्लेषक व विज्ञानाचे पुरस्कर्ते शास्त्रज्ञ होते. त्यामुळेच त्यांनी विज्ञानाधिष्ठित बौद्ध धम्माची स्थापना केली.असे प्रतिपादन डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे उपाध्यक्ष तथा अंनिसचे ऍड.हौसेराव धुमाळ यांनी केले.  फत्यापूर ता.सातारा येथे बुद्ध जयंती कार्यक्रमाच्या अनुषंगाने, “चमत्काराची दुनिया, विज्ञानाची किमया ” या कार्यक्रमात ऍड. धुमाळ मार्गदर्शन करीत होते.    

    आरंभी महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रशांत पोतदार, सातारा जिल्हा प्रसार माध्यम सचिव दशरथ रणदिवे, वीर पोतदार व मानस पोतदार यांचा सत्कार अनुक्रमे समता सामाजिक मित्र मंडळाचे अध्यक्ष बापूराव घाडगे,कोषाध्यक्ष विशाल कंठे,सरचिटणीस अमोल कंठे व बाळासाहेब वाघमारे  यांच्या हस्ते करण्यात आला.

                अध्यक्ष बापूराव घाडगे यांनी समता सामाजिक मित्र मंडळाच्या कार्याचा परिचय करून दिला.मंडळ सुमारे 25 वर्षे सामाजिक उपक्रम राबवित आहे. यावर्षी रक्तदान शिबीर राबवून व प्रबोधनात्मक कार्यक्रम घेवून एक आदर्शवत मंडळाचे निर्मितीसाठी  वाटचाल सुरू केली आहे. यात सर्व सदस्य व ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.”

                 प्रशांत पोतदार यांनी, “माझ्या भारत देशात, कोणी कितीही शिकला तरी साधं विज्ञान विसरला? ”  या अंतर्मुख करणार्‍या गीतांनी सुरुवात केली. सर्वप्रथम पाण्याचा दिवा जेष्ठ ग्रामस्थांचे हस्ते प्रज्वलित करून अनोखे असे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.तद्नंतर लंगर सोडवणे व नारळातील करणी काढणे या चमत्कारानी प्रेक्षकांना भारावून टाकले. यामध्ये बालगोपाळ व युवक युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला,. राज्य कायदा विभाग सदस्य ऍड.हौसेराव धुमाळ यांनी अंगात येण्यासंदर्भातील शास्त्रीय विश्लेषण करून अंगावरून जळता पलीता फिरवणे व जिभेतून त्रिशूल आरपार करणे या चमत्काराचे सादरीकरण केले. यावेळी हातावरून जळता पलिता फिरवून घेवून धाडसी युवक, युवती व महिलांनी त्यातील थरार अनुभवला. तसेच धुमाळ यांनी संविधान गीत गायिले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात प्रशांत पोतदार यांनी उभ्या दोरीवर नारळाची कवटी फिरवणे – थांबविणे, इंद्दियजन्य भ्रमाचा चमत्कार, संपलेले गंगाजलाची पुन्हा पुन्हा निर्मिती करून वितरण करणे, नख वाढण्याचा चमत्कार इ. चे सादरीकरण करून शेवटी सर्व चमत्काराचे शास्त्रीय विश्लेषण करूनही दाखवले. यापेक्षाही वेगळे चमत्कार पहायला मिळाले तरी न घाबरता निर्भयपणे त्याची वैज्ञानिक पद्धतीने चिकित्सा करा व आपले व्यक्तीमत्व समृद्ध करा.असे अवाहनही त्यांनी केले. यावेळी म.अंनिसच्या  वैचारिक पुस्तकाचे स्टॉलची जबाबदारी वीर पोतदार व मानस पोतदार या युवक कार्यकर्त्यांनी उत्तमरीत्या सांभाळली. प्रेक्षकांनीही त्यास छान प्रतिसाद देवून पुस्तके खरेदी केली.विनोद शिरसाट यांनी सूत्रसंचालन केले.सुशिल वाघमारे यांनी आभार मानले.सदरच्या

कार्यक्रमासाठी तांत्रिक सहकार्य म.अंनिस,जिल्हा प्रसार माध्यम सचिव दशरथ रणदिवे यांनी केले. सदरच्या कार्यक्रमास फत्यापूर पंचक्रोशीतील ग्रामस्थ, युवक युवती, अबाल-वृद्ध बहुसंख्येने उपस्थित होते.याकामी नवनाथ कंठे, विजय वाघमारे, सुरज कंठे, अक्षय घाडगे, अधिक कंठे, सचिन घाडगे, रोहित कंठे, प्रविण कंठे, सुशिल वाघमारे, संतोष कंठे, अमर वाघमारे, नरेंद्र कंठे, मिलिंद कंठे, विनोद गायकवाड आदींनी अथक असे परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here