डॉ. सुधा होवाळे यांनी गरिबीवर मात करून यश संपादन केले : कुसुम पवार

0

सातारा : प्रतिकूल परिस्थिती असताना वडिलांच्या मदतीने व पुढे लग्नानंतर पती प्राचार्य आण्णासाहेब होवाळे यांच्या सहाय्याने डॉ.सुधा होवाळे यांनी गरिबीवर मात करून शिक्षण पूर्ण  केले.त्यांनी कौटुंबिक व सामाजिक परिस्थिती बदलुन दाखवली. असे प्रतिपादन कुसुम पवार यांनी केले.

 प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ कालकथीत डॉ.सुधा अण्णासाहेब होवाळे यांचा पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम येथील श्रीमान हॉटेलच्या सभागृहात संपन्न झाला.तेव्हा कुसुम पवार आदरांजलीपर मार्गदर्शन करीत होत्या.

           संबोधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनकर झिंब्रे म्हणाले,”डॉ.सुधा होवाळे मित्तभाषी होत्या.तरीसुद्धा न बोलता कर्तृत्व वैद्यकीय व सामाजिक कार्यात उत्तुंग यश मिळविलेले आहे.त्यांनी पतीच्या मदतीने शैक्षणिक वारसा परिवारास दिला.मानवाने कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी टॉपवरच असले पाहिजे.हेसुद्धा डॉ.सुधा यांनी केलेल्या कर्तृत्वामुळे आढळुन आलेले आहे. “

   डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे उपाध्यक्ष ऍड.हौसेराव धुमाळ म्हणाले,”तत्कालीन महाराष्ट्र अंनिसचे प्राचार्य आण्णासाहेब होवाळे यांनी आपल्या पत्नीच्या मदतीने राज्य कार्यकारिणी व कुटुंब मेळावा स्वतःच्या निवासस्थानी शाहूपुरीत पार पाडण्यात आला होता.”

   लेखक सुदर्शन इंगळे म्हणाले, “मानवाने व्यक्तिगत जीवन जगत असताना समाजासाठी योगदान दिले पाहिजे.या संदर्भात, डॉ. होवाळे कायम समरणात राहतील.पुण्य केलेल्या कर्माचे फळ विकसीत फळ असते.” यावेळी माजी प्राचार्य रमेश जाधव,विविध संस्थाचे पदाधिकारी, मान्यवर व अनेक नातेवानी मनोगत व्यक्त करून डॉ.सुधा होवाळे यांच्या जीवनचरित्रावर प्रकाशझोत टाकला.

    प्रारंभी,पती बंधुत्व जीवनगौरव पुरस्कार विजेते प्राचार्य अण्णासाहेब होवाळे, मुलगा डॉ. सुबोध होवाळे,स्नुषा डॉ. मृणालिनी,मुली डॉ.स्वाती गायकवाड व डॉ. प्रज्ञा मुनतोडे, जावई डॉ.संजय गायकवाड व डॉ. प्रमोद मुनतोडे या परिवाराने महापुरुष व कालकथित डॉ.सुधा होवाळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

                 डॉ.सुधा होवाळे यांनी स्त्रीरोग तज्ञ म्हणून नावलौकिक कमावला असून सातारा सिव्हिल  हॉस्पिटलमध्ये निवासी वैद्यकीय अधिकारी तसेच पुणे येथील मेंटल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले आहे. सदरच्या कार्यक्रमास समितीचे उपाध्यक्ष रमेश इंजे,कार्याध्यक्ष अनिल वीर,अंनिसचे प्रशांत पोतदार,डॉ.दीपक माने,प्रकाश खटावकर,एन.डी.कांबळे आदी उपासक व उपासिका मोठ्या संख्येनी उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here