भारतीय बौद्ध महासभेसह तत्सम संघटनांनी ईव्हीएमबाबत तहसीलदार यांना निवेदन सादर !

0

सातारा/अनिल वीर : भारतीय बौद्ध महासभा व तत्सम संघटनांच्यावतीने तहसीलदार यांना कराड तालुकास्तरीय ईव्हीएम हटाव संदर्भात  महासभेचे अध्यक्ष बी.जी. माने,गायकवाड गुरुजी,नंदकुमार भोळे,विजय सावन्त,स्वप्नील कांबळे आदिनी निवेदन दिले.

   यावेळी महासभेचे पदाधिकारी, माजी श्रामनेर,महीला पदाधिकारी,बौद्धाचार्य, उपासक, उपासिका तसेच तालुक्यातील सर्व राजकीय पक्ष संघटना, सामाजिक संघटना,कराड शहर कार्यकारिणी,अध्यक्ष,सर्व पदाधिकारी,महीला पदाधिकारी, कराड तालुकेतील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्यावर श्रद्धा असणाऱ्या सर्व सामाजिक धार्मिक,राजकीय गावपातळीवरील सर्व स्थानिक मंडळे यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

                          सन २०२४च्या  लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम हटवून त्याऐवजी बॅलेट पेपरवरच मतदान घेण्यात यावे.अशा आशयाचे निवेदन आहे. निवेदनावर महाविहार बांधकाम अध्यक्ष व्ही.आर.थोरवडे, महासभेचे बी.जे.माने (तालुकाध्यक्ष),आप्पा अडसूळे (सरचिटणीस),संजीवन लादे (कोष्याध्यक्ष),आर.बी.पाटणकर (उपाध्यक्ष संस्कार विभाग),पदाधिकारी,अधिकारी,कार्यकते आदींच्या असंख्य स्वाक्षरी आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here