राज्यपाल रमेश बैस यांची शाळेस सदिच्छा भेट

0

सातारा/अनिल वीर : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी जि.प. प्राथमिक शाळा,क्षेत्रमहाबळेश्वर येथे स्नेहपूर्वक भेट दिली. अध्ययनार्थीनी लेझीमच्या तालावर राज्यपालांचे स्वागत केले.त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये मिसळून संवाद साधला. मुलांबरोबर शाळेच्या गुणवत्तेबाबत प्रशंसाही केली. याप्रसंगी मुख्याध्यापक सुशांत मोतलिंग यांनी स्वागत केले. शाळेची संपूर्ण माहिती राज्यपालांना देण्यात आली. स्वागतप्रसंगी पडसरे सर, सौ.सीमा क्षिरसागर,श्रीमती ज्योती कदम,सौ.प्रतिक्षा लोंढे, कु.मयुरी कांबळे,कु.महेश्वरी कांबळे,अध्यक्ष दत्तात्रय कांबळे, सरपंच सुनिल बिरामणे व ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here