सदाचाराच्या पायावरच विश्वपरिवर्तनाची उभारणी शक्य आहे : धम्मचारी शुभ्रकेतू 

0

सातारा/अनिल वीर : सदाचारातून दुखमुक्ती  ही भगवान बुद्धांची पायाभूत शिकवण आहे.दोषमुक्त जीवन जगणे हाच खरा धम्म आहे. असे प्रतिपादन त्रिरत्न बौद्ध महासंघाचे धम्मचारी शुभ्रकेतू यांनी केले. 

      बौद्ध सेवा संघ, महात्मा फुले नगर मुंबई व महिला मंडळ, करंदी,ता.जावली यांच्यावतीने राजरत्न बुद्धविहाराच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीच्या अनुषंगाने आयोजित एकदिवसीय धम्म परिचय शिबिर संपन्न झाले.तेव्हा  धम्मचारी शुभ्रकेतू मार्गदर्शन करीत होते.यावेळी सातारा केंद्राचे धम्मचारी संघदित्य उपस्थित होते.

        धम्मचारी शुभ्रकेतू म्हणाले, “धम्म म्हणजे सदाचार आणि सदाचार हाच धम्म आहे. तेव्हा माणसाने सदाचाराचा अंगीकार करून दोषमुक्त जीवन जगण्याचा प्रयत्न करावा.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यामुळे व त्यागामुळेच आज लोकांना सोन्याचे दिवस आले आहेत. धम्मपालनाने जग जवळ येऊन माणसा माणसातील संबंध बंधुभावाचे व मैत्रीपूर्ण होऊ शकतात.”

        प्रारंभी,पंचशीलच्या ध्वजाचे ध्वजारोहण महिला मंडळाच्या आयुषमती नीलम गंगावणे व महेंद्र गंगावणे यांच्या हस्ते पार पडले. त्रिशरण पंचशील आणि बुद्धपुजेने शिबिराला प्रारंभ झाला. धम्मचारी शुभ्रकेतू यांचं स्वागत दिलीप गंगावणे यांनी तर धम्मचारी संघादित्य यांचे स्वागत बाळासाहेब गंगावणे यांनी केले. धम्मचारी संघादित्य यांनी आनापानसती या ध्यानाचा सराव तसेच संपर्क सराव करून घेतला. धम्ममित्र किशोर जाधव, धम्ममित्र दीपक साळवे, छाया साळवे, ललिता गडांकुश आणि धम्ममित्र मिलिंद कांबळे यांनी गट गटचर्चेचे नेतृत्व केले. यावेळी धम्ममित्र सीमा कांबळे, धम्ममित्र दया जगताप, धम्ममित्र रत्नसागर जाधव आणि मुकेश गंगावणे यांनी सहभाग नोंदवला.

शिबिराच्या संपूर्ण कार्यक्रमाचे  नियोजन व संयोजन धम्मचारी अभयबोधी,दिलिप गंगावणे, बाळासाहेब गंगावणे,शिवाजी गंगावणे,मधुकर गंगावणे, महेंद्र गंगावणे, मिलिंद गंगावणे, सुरेश गंगावणे,माया गंगावणे, छाया गंगावणे, नंदा गंगावणे,दयानंद गंगावणे, विशाल गंगावणे व राजेश गंगावणे यांनी केले.मिलिंद कांबळे सूत्रसंचालन केले तर  शिवाजी गंगावणे यांनी आभार मानले.विशेष बुद्धपुजेचे आयोजन करण्यात आले होते. सामूहिक भोजनाने सांगता करणयात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here