तालीम संघ ते राजवाडा येथील फुटपाथवरील अतिक्रमणे काढावीत !

0
फोटो : मुख्याकारी बापट यांना निवेदन सादर करताना सागर फाळके व बबलू वायदंडे.(छाया-अनिल वीर)

 सातारा/अनिल वीर: तालीम संघ ते राजवाडा या मुख्य बाजारपेठेत वर्दळ असते.तेव्हा फुटपाथवरील अतिक्रमणे काढावीत.अशी मागणी मुख्याधिकारी बापट यांच्याकडे रिपाईतर्फे सागर फाळके व बबलू वायदंडे यांनी केली आहे.

       येथील मुख्य बाजारपेठेत अनेक भागातून लोक बाजार व खरेदीसाठी ये-जा करत असतात. त्याच भागांमध्ये शाहमज्जिदच्या शेजारी काही दुकानदारांनी  आपली दुकाने फुटपाथवरती टाकलेली आहेत. तसेच काही दुकानदारांनी फुटपाथ आपल्याच दुकानाचा भासग बनवलेला आहे. त्यामुळे  लोकांना त्याचा त्रास होत आहे. त्यामुळे पदाचारी महिला, वृद्ध लोकं, शाळकरी विद्यार्थी आदींना  त्रास सहन करावा लागत आहे. तसेच फूटपाथवर दुकाने असल्यामुळे माणसे रस्त्यावर चालतात व अपघातही होतात. बऱ्याच वेळा याबाबत लेखी निवेदन देऊन सुद्धा आपले अतिक्रमण विभागाचे अधिकारी या बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. त्याचा नाहक असा त्रास शहरवासीयांना व ग्रामीण भागातील  लोकांना होत आहे. तरी याबाबत योग्य ती दखल घेऊन तालीम संघापासून असणाऱ्या दोन्ही बाजूंच्या रस्त्यावर फुटपाथवरती असणारे सर्व अतिक्रमणे काढण्यात यावीत.अन्यथा, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल.असाही इशारा देण्यात आलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here