राहुल गांधींवरील कारवाई निषेधार्थ माहूर तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने निदर्शने व धरणे

0
फोटो :माहूर तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी निदर्शने व धरणे आंदोलन करण्यात आले. तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

माहूर – काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा ठोठावून तडका फडकी लोकसभेचे सदस्यत्व रद्द करण्याची जी कारवाई करण्यात आली त्या कारवाईच्या निषेधार्थ माहूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी (दिनांक २८) माहुरगड संपर्क कार्यालय ते डॉ. बाबसाहेब आंबेडकर चौक पर्यत  पदयात्रा काढण्यात आली.
            डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात सदरील घटनेचा जाहीर निषेध  व्यक्त  करण्यात आला. त्यानंतर  तहसीलदार किशोर यादव यांना निवेदन देण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या  लोकशाही मधील महत्त्वाचा घटक असलेल्या विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याच्या, कट कारस्थानाचा कॉंग्रेस नेत्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
           नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक प्राचार्य राजेंद्र केशवे,माहूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी जि.प.सदस्य संजय राठोड, कॉंग्रेस शहराध्यक्ष आनंद पाटील तूपदाळे, तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप मुनगीलवार, माजी सभापती अनिताताई कदम, माजी उपनगराध्यक्षा अश्विनी तुपदाळे, गोविंदराव मगरे पाटील, रहेमत अली, अतुल कडू पाटील,  तालुका प्रवक्ते जयकुमार अडकीने,  खाजाभाई, लक्ष्मण बेराडे, देविदास काळे,नगरसेवक प्रा.विलास भंडारे, दत्तात्रेय शेरेकर, विक्रम राठोड,प्रमोद राठोड, राजु सौंदलकर, निसार कुरेशी, करीम शहा,  दीपक मुरादे, अनिल माडपेलीवार, युवक काँग्रेस उपाध्यक्ष सचिन बहिरे, अबीद खिच्ची, संजय गायकवाड, यांच्या सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here