महाराष्ट्राच्या भूमीत शिवराय जन्मले;गुजरातच्या भूमीत औरंग्या जन्मला – उद्धव ठाकरे

0

रत्नागिरी : महाराष्ट्राच्या भूमीत शिवराय जन्मले आणि गुजरातच्या भूमीत औरंग्या जन्मला अशा तिखट शब्दात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोडी यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले . काल कोल्हापूर येथे मोडी यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेना उ ब ठा वर टीका करीत ठाकरे यांनी औरंगजेबाला मानणाऱ्या सोबत गेल्याचा आरोप केला होता . रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजप, नारायण राणे आणि नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली.

रत्नागिरीतील प्रचारसभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “कोकणाचा प्रचाराची गरज नाही. शिवसेना चोरली, गद्दारांना धनुष्यबाण दिला आणि ज्यांना दिला त्यांच्याकडून कोकणातून धनुष्यबाण गायब केला.”

ते पुढे म्हणाले, “मोदींना सूरच लागत नाही. आता आयपीएलचं सुरू आहे. तसंच राजकारणाचं झालं आहे. कोण कोणाकडून आहे हेच होतं. 2019 मध्येही आपण फसलो होतो. एक अकेला सब पे भारी अशी त्यांची मस्ती होती… पण एक अकेला सब पे भारी, आजुबाजुला सब भ्रष्टाचारी अशी स्थिती झाली आहे. अटलजींचा आत्मा हे पाहून रडत असेल.”

शिवसेना आणि भाजपच्या संबंधांवर बोलताना ठाकरे म्हणाले की, “शिवसेना सोबत होती तेव्हा महाराष्ट्रात यायची त्यांना गरज नव्हती. पण त्यांचा विनाश व्हायचा होता त्यामुळंच त्यांच्यापासून नियतीनं शिवसेनेला वेगळं केलं.

“पदं, मंत्रिपदं घेतली तरी त्यांना कोकणासाठी काही आणता आलं नाही. शिवसैनिक ही माझी वडिलोपार्जित संपत्ती आहेत. मोदी म्हणतात घराणेशाही, पण आमची घराणेशाही लोकांना मंजूर आहे. शिवसेनेची घराणेशाही नको पण गुंडांची घराणेशाही तुम्हाला हवी आहे.

“सरकार आल्यानंतर बारसू सारखे विरोध डावलून त्यांना हवं ते करतील. पण आम्ही कोणताही विनाशकारी प्रकल्प येऊ देणार नाही. जसे ते यांना मत म्हणजे त्यांना मत म्हणत आहे, तसं मोदींना मत म्हणजे विनाशाला मत आहे. यांचा महाराष्ट्रावर असलेला आकस अगदी टोकाला पोहोचला आहेत.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here