विदेशी पाहुण्यांनी माहूरगडावर गायला जोगवा; भाविक मंत्रमुग्ध

0
.फोटो : विदेशातून आलेल्या चाळीस पाहुण्यांनी श्री रेणुका देवीचे दर्शन घेऊन देवीच्या दरबारात जोगवा, गोंधळ घातला.(छायाचित्र बालाजी कोंडे)

माहूर : माहूर हे महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ आहे. मंगळवारी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, ग्रीस, मलेशिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, पोलंड या देशातून आलेल्या चाळीस विदेशी पाहुण्यांनी श्री रेणुका देवीचे दर्शन घेऊन देवीच्या दरबारात जोगवा, गोंधळ घातला. श्री रेणुका देवीच्या दर्शनाने मन प्रसन्न झाले अशा प्रतिक्रिया विदेशी पाहुण्यांनी दिल्या.
                  विश्वस्त चंद्रकांत भोपी, विश्वस्त संजय कांनव यांनी  विदेशी पाहुण्यांचे स्वागत केले. मंगळवारी सकाळी अकरा वाजता.ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, ग्रीस, मलेशिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, पोलंड या देशातून आलेल्या चाळीस विदेशी पाहुण्यांनी श्री रेणुका देवीचे दर्शन घेतले. श्री रेणुका देवीच्या संगीत सेवेच्या व्यासपीठावर जोगवा,गोंधळ घातला. विदेशी पाहुण्यांनी गायलेला गोंधळ,जोगवा ऐकून भाविक मंत्रमुग्ध झाले.       .
              सहजयोग परिवार यवतमाळ यांच्यावतीने आज सायंकाळी संगीत व आत्मसाक्षात्कार हा कार्यक्रम  यवतमाळ येथे आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी हे विदेशी पाहुणे आलेले आहेत. श्री रेणुका देवी संस्थान च्या वतीने सर्व विदेशी पाहुण्यांना विश्वस्त चंद्रकांत भोपी यांनी माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here