धरणे आंदोलन १५ ऑगष्ट पासून सुरू असूनही अद्याप न्याय नाही !

0

!

सातारा/अनिल वीर :  १५ ऑगस्ट २०२३ हा स्वातंत्र दिन साजरा केल्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) यांच्यावतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे-आंदोलन सुरू करण्यात आले असून अद्याप न्याय मिळालेला नाही.

       बोगस कास पठार कार्यकारी समिती आणि सातारा वनक्षेत्रपाल (प्रा).उपवनसंवरक्ष, सहाय्यक वनसंवरक्षक (वनिकरण व कँपा ) सातारा. वनक्षेत्रपाल (प्रा) मेढा, वनपाल बामणोली तसेच सदर बोगस समितीत सचिव म्हणून काम करणारा वन कर्मचारी यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल करावेत. मराठी मिशन, वायंडर चर्च मिनिस्टीची व जंगम मालमत्ताची विल्लेवाट लावण्यासाठी बोगस डॉक्युमेंटस, बोगस शिक्के तयार करून त्याचा चुकीचा वापर करणाऱ्या लखोबा लोखंडेवर मोका अंतर्गत कारवाई करावी. विद्यार्थ्याचा आरटीई प्रवेश नाकारणाऱ्या गुरुकूल, शानबाग, युनिवर्सल स्कूलची मान्यता तात्काळ रद्द करून त्या शिक्षण सम्राटांवर अॅट्रासिटी दाखल करावी. ७० वर्षापासून सातारा जिल्हयात रहिवासी असलेल्या अदिवासी समाजातील लोकाना मुलभुत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. भरतगाव हद्दीतील राजेश मोटर्सचे, अशोक लेलंडचे नैसर्गिक ओढ्यावर बांधलेले अतिक्रमित बांधकाम आणि त्यावर बसविलेला विद्यूत ट्रान्सफार्मर तात्काळ काढून संबंधीतांवर तात्काळ कारवाई करावी. या प्रमुख मागण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरु असून अदिवासी बांधवाना घरकुलची सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाही सातारा नगरपरिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी निवासी जिल्हाधिकारी आवटे सौर. यांच्या दालनात झालेल्या बैठकीत सर्वासमझ दिल्याने आदिवासी बांधव आणि रिपाई पदाधिकार्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे.निवासी जिल्हाधिकारीआवटे यांनी संबंधीत विभागाशी फोनवरून संपर्क करून प्रश्न सोडविण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, त्याबाबत आज रोजी लेखी अश्वासन न मिळयाने बेमुदत धरणे आंदोलन चालुच राहणार आहे. त्यामुळे व्देष पुर्ण भावनेने समाज कंटकांकडून जाणीवपूर्वक कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील. असेही पदाधिकारी यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे. जिल्हाध्यक्ष संजय (तात्या) गाडे व प.महाराष्ट्र सचिव चंद्रकांत (दादा) कांबळे यांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या आंदलनास विविध संघटनांनी पाठींबा दिला आहे.शाहिर श्रीरंग रणदिवे यांनी लोकशाहीर वामनदादा कर्डक यांचा, “आता मग सरायचं नाय,माणसाचा लढा आज पेटला….आदी पोवाडे गाऊन आंदोलनकर्त्यांना प्रोत्साहित केले. आंदोलनस्थळी पक्षाचे जिल्हा संघटक दिपकभाऊ कदम, महासचिव सुहास मोरे,युवक जिल्हाध्यक्ष विशाल कांबळे, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष आशुतोष वाघमोडे,कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष नितीन (मामा) चव्हाण व युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पोळ,मराठा आघाडीचे जिल्हाध्यक्ष दीपक जामदार व तालुकाध्यक्ष प्रशांत पवार,जिल्हा उपाध्यक्ष अनिष कांबळे,मनोज जगताप,विजय यादव,गणेश बावधने तसेच सामाजिक कार्यकर्ते किशोर धुमाळ,अनिल वीर,मधुसूदन काळे,ऍड.विलास वहागावकर आदी विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते व महिला मोठया संख्येनी उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here