26 वर्षानंतर भेटले चांदेकसारे विद्यालयातील माजी विद्यार्थी

0

जुन्या आठवणींना मिळाला उजाळा

कोपरगाव ( वार्ताहर) कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील न्यू इंग्लिश स्कूलचे माजी विद्यार्थी तब्बल 26 वर्षानंतर पुन्हा भेटले. विद्यार्थ्यांसोबत त्यांना शिक्षण देणारे शिक्षकही उपस्थित होते. एकमेकांच्या जुन्या आठवणींना यावेळी उजाळा मिळाला.

सन 1998 सालची इयत्ता दहावीची बॅच एकत्र आणण्याची कल्पना चांदेकसारे येथील माजी विद्यार्थ्यांना सुचली.त्यांनी 1998 सालच्या शिक्षकांना तसेच दहावीत शिक्षण झालेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांना फोन करून स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे आमंत्रण दिले.अगस्त कृषी पर्यटन केंद्र सावळीविहीर येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी त्याकाळचे दहावीचे शिक्षक व्ही टी होन, रावसाहेब जावळे, प्रकाश उंडे, मधुकर टाकसाळ, शिक्षेकेतर कर्मचारी शिवाजी होन, माजी विद्यार्थी किरण होन, प्रमोद होन, भीमराज जावळे, मोहन पवार, मनोज होन, प्रकाश होन, अनिल दहे, कांतीलाल दहे, रवींद्र पुंगळ, सचिन गुरसळ, सचिन खरात, दत्तू खरात, हिरामण पवार, प्रकाश कुलकर्णी, सुधाकर वक्ते, आनंद गुरसळ ,राजू गुरसळ, सारंग टाकसाळ ,हरी पवार, संदीप मिसाळ तर माजी विद्यार्थिनी योगिता सुभाष होन, योगिता गोरक्षनाथ होन, स्मिता होन, सीमा दहे, शितल भोसले, माधुरी वक्ते ,जयश्री चव्हाण, आशा दहे ,शालिनी गुरसळ अदी उपस्थित होते.इतक्या वर्षांनी भेट झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी सरस्वती पूजन करत कार्यक्रम सुरू केला. अनेक जुन्या आठवणी कथन करताना विद्यार्थी व विद्यार्थिनींनी भारुवुन गेल्या होत्या. तर आदर्श शिक्षक व्ही टी होन ,प्रकाश उंडे यांनी तब्बल 26 वर्षानंतर विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती दाखवलेली कृतज्ञता पाहून त्यांचे कौतुक केले.1998 च्या दहावीचे विद्यार्थी आज सक्सेसफुल झाले असून अनेकांनी व्यवसायामध्ये आपले स्थान निर्माण केले आहे तर काहींनी नोकरी पत्करली आहे. तर अनेकांनी आपल्या पारंपरिक शेती व्यवसायामध्ये लक्ष केंद्रित करून दुग्ध व्यवसाया मध्ये प्रगती साधली आहे.सदर कार्यक्रमानंतर सर्वांना स्नेहभोजन देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र पुंगळ यांनी केले तर आभार किरण होन यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here