मुनावळे जलपर्यटनस्थळी बोटीतून १०० टक्के मतदानाचा संदेश

0

जावळी : सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने स्वीप कार्यक्रमांतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ‘स्वीप’च्या नोडल अधिकारी याशनी नागराजन यांच्या संकल्पनेतून मुनावळे येथे एमटीडीसी पर्यटन केंद्राच्या सहाय्याने लोकांना मतदानाकडे आकर्षित करण्यासाठी अभिनव उपक्रम राबविण्यात आला.

कोयना धरणाच्या जलाशयात हा उपक्रम राबविला. यासाठी बोटींचा सहभाग घेण्यात आला. त्यावर मतदानाची तारीख आणि १०० टक्के मतदान करणार असा मजकूर होता. यामुळे स्थानिक नागरिक तसेच पर्यटनासाठी आलेल्या लोकांमध्येही मतदानाचे महत्व पटविण्यात या उपक्रमाचा हातभार लागला. तर यापूर्वी प्रशासनाने मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मानवी साखळी उपक्रमाचे आयोजन केले होते.

मुनावळे येथील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, जावळीचे गटविकास अधिकारी मनोज भोसले, ग्रामसेवक आदींनी प्रयत्न केले. सातारा स्वीप कक्षामधील किरण कांबळे, राजेंद्र भोसले यांनी कार्यक्रमाचे नियोजन करून पर्यटकांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्याचे काम केले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here