विविध कार्यक्रमाने बुद्ध जयंती साजरी होणार ! 

0

सातारा : विविध ठिकाणी बुद्ध पौर्णिमा साजरी होणार असली तरी डॉ.बाबासाहेब आंबेडकर महोत्सव समितीतर्फे मे महिन्यातील बुद्ध जयंतीचे नियोजन करण्यात येणार आहे. येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास प्रथमतः पुष्पहार मारुती भोसले,डॉ. पाटोळे व नागटिळक यांच्या हस्ते अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तेव्हा विविध विषयांवर चर्चा-विनिमय झाला.

      यावेळी समिती,धम्मबांधव कमिटी व इतर संघटनांनी जमा-खर्च अहवाल ग्रुपवर द्यावा. शिवाय,आगामी मीटिंगमध्ये संबंधित कोषाध्यक्ष जाहीर करतील.याविषयावर अंतिम व सरतेशेवटी निर्णय घेण्यात आला. दरम्यान,भाजपा विरोधार्थ मतदान यावर विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आपापली मते व्यक्त केली.शेवटी मतदार सुजाण असल्याने त्यांनीच योग्य निर्णय घ्यायचा आहे.या मतावर लांबलेल्या चर्चेवर पडदा टाकण्यात आला.दिलीप फणसे यांनी अहवालाबाबत विषयाला हात घातला.त्यावर अनिल वीर यांनी वर्षभर कार्यक्रमांची रेलचेल असुन जो आतापर्यंत खर्च झाला असेल तो कोषाध्यक्ष रीतसर देतीलच.ज्येष्ट सन्मान सोहळा कोणत्या पद्धतीने करावयाचा आहे.याबाबतही विचारविनिमय करण्यात येणार आहे.

समिती ही महापुरुषांनी सांगितलेल्या विचारांवर कार्यरत आहे.याबाबत सर्वच व्यवहार पारदर्शक असणार आहे.जमा-खर्चाचा अहवालबाबत  शंका घेऊ नये.तेव्हा कोण्हीही बाहेर चर्चा करू नये.अशा अनेक विषयांवर चर्चा सकारात्मक झालेल्या आहेत.यावेळी मार्गदर्शक रमेश इंजे,प्राचार्य अरुण गाडे,चंद्रकांत खंडाईत, नवनाथ लोंढे,बी.एल. माने,युवा शाहिर सत्यवान गायकवाड, रामचंद्र गायकवाड,मुरलीधर खरात,विकास तोडकर,अंकुश धाइंजे,घोडके – सातारा व कण्हेरकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here