सातारा शहरात आ.शशिकांत शिंदे यांची प्रचारफेरी

0

सातारा/अनिल वीर : शहर व ग्रामीण तालुक्यातील सर्व विभागाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत सातारा लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार आ. शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ सातारा शहरातून प्रचारफेरी काढण्यात आली.

  प्रथमतः पंचपाळी परिसरात आ.शिंदे यांचे स्वागत-सत्कार करण्यात आले.तद्नंतर तुतारीच्या निनादात वाजत-गाजत प्रचारफेरी राष्ट्रवादी भवनपर्यंत होती.यावेळी इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांचे नेते,तत्सम संघटनांचे प्रतिनिधी ऍड.वर्षाताई देशपांडे,असंख्य महिला,शहर सुधार,परिवर्तनवादी संघटना आदी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व कार्यकर्त्या मोठ्या संख्येनी सहभागी झाल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here