कोपरगाव गुरुजी प्रीमियर लीग 2024 वर सहजानंदनगर संघाचे वर्चस्व,

0

प्रथम पारितोषिकासह विविध बक्षिसांचा वर्षाव

पोहेगांव(वार्ताहर ) : कोपरगाव तालुका प्राथमिक शिक्षक क्रिकेट असोसिएशनच्या वतीने कोपरगाव गुरुजी प्रीमिअर लीग 2024 या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. फायनल सामन्यात सहजानंदनगर व दहिगाव बोलका संघ आमने सामने आले.यामध्ये दहिगाव बोलका संघाचा पराभव करत सहजानंद नगर संघ विजेता ठरला. प्रथम पारितोषकासह विविध बक्षिसांचा वर्षाव या संघावर करण्यात आला. 

द्वितीय विजेतेपद दहिगाव बोलका संघाकडे गेले. तर तृतीय विजेतेपद नगरपालिका संघाने आपल्याकडे ठेवले. येसगाव संघ चतुर्थ विजेता ठरला.या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट झेल  सुनील पोरे यांनी पकडले होते. त्यांना उत्कृष्ट झेल पुरस्कार देण्यात आला. बाळू दिघे यांनी उत्कृष्ट पद्धतीने विकेटकीपरींग केली त्यांनाउत्कृष्ट विकेटकिपर  म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला.

उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कामडी_,हॅट्रिक वाकचौरे , रांजणगाव देशमुख मेडन ओव्हर संघ,उत्कृष्ट गोलंदाज – किरण निंबाळकर सर्वाधिक षटकार नितीन वायाळ ,सर्वोत्कृष्ट संघनायक कैलास वाघ, सर्वोत्कृष्ट संघ म्हणून पोहेगाव संघाने बाजी मारली. या संपूर्ण स्पर्धेत मालिकावीर म्हणून बंडू राठोड यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक शिक्षक बँकेचे संचालक माणिकराव कदम, द्वितीय पारितोषिक शशिकांत जेजुरकर सर, तृतीय पारितोषिक ज्ञानेश्वर वाकचौरे,चतुर्थ पारितोषिक विद्युलता आढाव  व तालुक्यातील इतर शिक्षकांनी मोलाचे आर्थिक योगदान दिले. प्रमुख पाहुणे म्हणून यश विसपुते, किशोर बागुल, संतोष कुमार नायक, भाऊसाहेब भाबड अदी उपस्थित होते. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कोपरगांव तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांनी अपार परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here