काळे -कोल्हे – परजणे युतीच्या सहमती एक्सप्रेसला (उ.बा.ठा.) शिवसेनेचा खोडा;

0

कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न फसला . १५ जागेसाठी ३८ उमेदवार रिंगणात
कोपरगाव : कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक बिनविरोध करण्याचा काळे – कोल्हे – परजणे यांच्या सहमतीच्या राजकारणाला शिवसेना (उ बा ठा) गट आणि काही शेतकऱ्यांनी खोडा घालत निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न हाणून पाडला . गेल्या १५ वर्षांपासून बिनविरोध असणाऱ्या बाजार समितीमध्ये निवडणूक होणार आहे. काल नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तिन्ही नेते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तडजोडीचे पुरेपूर प्रयत्न करीत होते. मात्र दुपारी तीन वाजेपर्यंत विरोधी गटांचे समाधान न झाल्याने अखेर निवडणूक बिनविरोध होणार नाही हे स्पष्ट झाले.
एकूण दाखल १०४ उमेदवारांपैकी ६३ उमेदवार तर ०३ जागा बिनविरोध झाल्या असून १५ जागेसाठी ३८ उमेदवारांचे अर्ज कायम राहिले आहेत. यामध्ये शिवसेनेने आपले ०९ उमेदवार उभे केले आहेत. शिवसेनेचा पूर्ण पॅनल जरी या निवडणुकीमध्ये उभा राहू शकला नसला तरी बाजारसमितीमध्ये गेल्या १५ वर्षांपासूनच्या प्रस्थापित काळे-कोल्हे-परजणे गटाने सहमतीने राबविलेल्या सत्तेला तोडके मोडके असले तरी आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. कोपरगाव तालुक्यात विधानसभेच्या निवडणुकांमध्ये एकमेकांच्या विरोधात दंड थोपटणारे काळे – कोल्हे गट आपल्या ताब्यातील साखर कारखाने व इतर सहकारी संस्थांच्या निवडणुका मात्र अचानकपणे बिनविरोध करत आले आहेत . इतरवेळी काळे आणि कोल्हे दोहोंनाही त्रासदायक ठरणारा विखे- परजणे गट अचानकपणे आपले हत्यार म्यान करून वरील दोन्ही गटाच्या हा मध्ये हा करीत आपल्या हिश्याची सत्ता पदरात पाडून घेत आला आहे. त्यामुळेच होणाऱ्या कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये फार काही वेगळे होण्याची अपेक्षा कोणालाही नव्हती. मात्र राज्यात झालेल्या सत्तातरा नंतर कोपरगाव तालुक्यातील उ.बा.ठा. गट आपले अस्तित्व दाखवण्यासाठी आक्रमक होऊ लागला आहे. त्याच कारणास्तव या गटानेही बाजार समितीच्या निवडणुकीत सत्तेचा वाटा मागण्यास सुरवात केली होती . मात्र काळे-कोल्हे-परजणे गटाने उ.बा.ठा. गटाऐवजी औताडे गटाला सहमतीच्या एक्सप्रेमध्ये घेण्यास पसंती दाखल्यामुळेच उ.बा.ठा. गटाने आपल्या उमेदवारांचे अर्ज मागे घेण्यास नकार दिला . तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे यांनी यामध्ये मध्यस्थी करत मध्यम मार्ग काढण्याचा बराच प्रयत्न केला . परंतु दोन्ही नेत्यांच्या संपर्क कार्यालयातून त्यास फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे शिवसेनेचे उत्तर नगर जिल्हा प्रमुख प्रमोद लबडे, माजी शहर प्रमुख भरत मोरे, अस्लम शेख यांचे म्हणणे आहे.
बाजार समितीमध्ये उभे असलेले उमेदवार पुढील प्रमाणे सर्वसाधारण गट-
लामखडे साहेबराव शिवराम, रोहोम साहेबराव किसन, पवार विष्णू नानासाहेब, चांदगुडे किरण मधुकर, पवार धनराज मनसुख, शिंदे लक्ष्मण विश्वनाथ,जाधव विजय सुधाकर, गव्हाणे रंगनाथ सोपान, देवकर शिवाजी बापूराव, आसने कैलास भीमा,शिंदे संजय माधवराव, टेके रावसाहेब चांगदेव,परजणे गोवर्धन बाबासाहेब, हेगडमल देवराम रामभाऊ, गवळी राहुल सुरेश, गोर्डे बाळासाहेब गंगाधर
महिला राखीव मतदार संघ-
कदम मीरा सर्जेराव, बारहाते हिराबाई रावसाहेब,जावळे गयाबाई धर्मा, डांगे माधुरी विजय
इतर मागास प्रवर्ग-
पवार गिरीधर दिनकर, फेफाळे खंडू पुंजाबा, बिडवे दत्ता नामदेव

ग्रामपंचायत मतदार संघ-
दंडवते संजय काशिनाथ, पाडेकर विष्णू एकनाथ, निकोले राजेंद्र शंकर
व्यापारी आडते मतदार संघ-
कोठारी सुनील गोकुळचंद, धाडीवाल ललीतकुमार तेजमल, सांगळे ऋषिकेश मोहन, भट्टड संजय
शामलाल, शाह मनीष जयंतीलाल, नदीम अहमद रियाज अहमद खान, ठक्कर संतोष मंगलदास, निकम रेवणनाथ श्रीरंग
हमाल मापाडी मतदार संघ-
शेळके जलदीप भाऊसाहेब, मरसाळे अर्जुनभगवान,साळुंके रामचंद्र नामदेव

सहमतीच्या राजकारणाला बसलेला पहिला व एकमेव धक्का ठरो !
आतापर्यंत काळे – कोल्हे या पारंपरिक विरोधकांनी लोकसभा , विधानसभा , नगरपालिका ,ग्रामपंचायती निवडणुकामध्ये असेलेला राजकीय विरोध आपापल्या ताब्यातील साखर कारखाने , जिनिंग मिल, कुक्कुट पालन संस्था ,सह . औद्योगिक संस्था , सह.दूध संस्था यामध्ये अजिबात येऊ दिला नाही. यामध्ये त्यांचा राजकीय हेतू सोबतच आर्थिक स्वार्थही असू शकतो . मात्र या संस्थांच्या निवडणुकांमध्ये लाखो कोटी रुपये उधळण्यापेक्षा सहमतीने विकासावर भर देण्याचा प्रयत्न राहिला आहे. परंतु असे करताना सहकारातील लोकशाहीमध्ये घराणेशाही व एकाधिकारशाही निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. आज बाजार समितीमध्ये अल्पसा का होत नाही मात्र विरोध होण्यास सुरवात झाली आहे. हाच विरोध या दोन्ही नेत्यांच्या सहमतीच्या साम्राज्याला हादरे देणारा भूकंप न ठरो !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here