गोंदवले – केंद्रशाळा वडजल अंतर्गत सर्व शाळांची शाळा पूर्व तयारी कार्यशाळा केंद्रप्रमुख अशोक गंबरे यांच्या अध्यक्षतेखाली व सौ.केशर माने व सौ.भारती जाधव यांच्या सखोल मार्गदर्शनाखाली आनंददायी संपन्न झाली.
प्रथम सरस्वती पूजनाने कार्यशाळेची सुरूवात झाली यावेळी केंद्रप्रमुख गंबरे साहेब यांनी कार्यशाळे विषयी सविस्तर माहिती दिली.सौ.केशर माने व सौ.भारती जाधव यांनी शाळापूर्व तयारी बाबत सर्व शिक्षकांना व अंगणवाडी ताईंना सहभागी करून नावनोदंणी स्टाॅल,शारिरीक विकास स्टाॅल,बौध्दिक विकास स्टाॅल,सामाजिक व भावनात्मक विकास स्टाॅल,भाषा विकास स्टाॅल,गणन पूर्वतयारी स्टाॅल,माता-पालक उद्बबोधन स्टाॅल असे आकर्षक स्टाॅल उभारून अतिशय आनंददायी प्रकारे कार्यशाळा संपन्न झाली.
उपस्थितांचे स्वागत सौ.केशर माने मॅडम यांनी केले तर आभार सौ.भारती जाधव मॅडम यांनी मानले.